scorecardresearch

Premium

IND vs ENG Warm Up Match: टीम इंडियाचा अभ्यास पाण्यात! भारत विरुद्ध इंग्लंड गुवाहाटीतील सराव सामना पावसामुळे रद्द

India vs England Warm Match, World Cup 2023: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही.

IND vs ENG Warm Up Match: India vs England practice match in Guwahati canceled due to rain match did not start after the toss
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

IND vs ENG Score, ICC Cricket World Cup 2023 Warm Up Match Updates: विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व संघ सराव सामन्यात सहभागी होत आहेत. गुवाहाटी येथे शनिवारी (३० सप्टेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे अंपायर्सनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले.

पावसामुळे टीम इंडियाचा सराव गेला पाण्यात

भारत आणि इंग्लंडच्या संघांना विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळाली नाही. दोघांमधील पहिला सराव सामना गुवाहाटी येथे होणार होता, मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही. गुवाहाटी येथील स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक पोहोचले होते, मात्र त्यांना निराश होऊन परतावे लागले. या मैदानावर २९ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सराव सामना पूर्ण झाला. त्यात बांगलादेशने सात गडी राखून विजय मिळवला होता.

World Cup 2023: England traveled 38 hours in economy class and rained on the match Bairstow upset
World Cup 2023: इकॉनॉमी क्लासमध्ये इंग्लंडने केला ३८ तासांचा प्रवास अन् सामन्यावर पावसाने फिरवले पाणी; बेअरस्टो नाराज
IND vs AUS: Babar actually thanked Dravid for giving Shubman a break Know the truth about viral posts
Babar Azam: बाबर आझमने शुबमन गिलला विश्रांती दिल्याने राहुल द्रविडचे मानले आभार, काय आहे सत्य? जाणून घ्या
Dinesh Karthik Reveals About R Ashwin
IND vs AUS: आशिया कप फायनलसाठी पहिल्यांदा आश्विनला बोलावण्यात आले होते, परंतु ‘या’ कारणामुळे त्याने दिला नकार
Asian Games 2023 IND vs MAL: Shafali Verma's brilliant half-century Team India set a challenge of 177 runs in front of Malaysia
Asian Games 2023, IND vs MAL: शफाली वर्माचे शानदार अर्धशतक! पावसामुळे सामना रद्द, टीम इंडिया चांगल्या रँकिंगच्या जोरावर पोहोचली सेमीफायनलला

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर हवामान खराब झाल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. सततच्या पावसामुळे अंपायर्सनी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द झाल्याचे घोषित केले. टीम इंडिया आता ३ ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे.

विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघात अक्षरऐवजी अश्विनला संधी मिळाली आहे

गुवाहाटी सामन्याआधी अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने आर. अश्विनचा संघात समावेश केला आहे. मात्र, आर. अश्विनप्रमाणे महेश पिठिया देखील ऑस्पिन गोलंदाजी करतो आणि दोघांची गोलंदाजी सारखीच आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाने महेशला ऑफर दिली होती. मात्र आपल्या प्रशिक्षकाचा सल्ला घेतल्यानंतर त्याने कांगारूंचा हा प्रस्ताव नाकारला आहे.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषक २०२३नंतर टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू घेणार निवृत्ती; गुवाहाटीत म्हणाला, “हा माझा शेवटचा वर्ल्डकप…”

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

इंग्लंडः डेविड मलान, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), मोईन अली, सॅम कुरन, आदिल रशीद, ख्रिस वोक्स, मार्क वुड, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड विली, रीस टोपले, गस अॅटकिन्सन.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs eng warm up practice match between india and england canceled due to rain match did not start after the toss avw

First published on: 30-09-2023 at 18:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×