Pakistan Semi Final Chance : विश्वचषक स्पर्धेतील ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरी गाठली आहे. तर उपांत्य फेरीतल्या चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच त्यांचा नेट रनरेटही उत्तम आहे. तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना पाहायला मिळू शकतो. तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेला भारत चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाशी दोन हात करणार आहे. या चौथ्या स्थानासाठी तीन संघांमध्ये सध्या चुरस आहे.

पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत असल्यामुळे पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होण्याची शक्यता बळावली आहे. उभय संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला तर हे संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर एकमेकांशी दोन हात करतील. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत उभय संघांमध्ये उपांत्य फेरीतला सामना खेळवण्यात आलाहोता. मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता.

‘असं’ आहे पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं समीकरण

दरम्यान, साखळी फेरीतला पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडशी होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत मोठा विजय मिळवणं आवश्यक आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ बांगलादेशविरुद्ध पराभव होणं गरजेचं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात करायला हवी. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघ पराभूत झाले आणि पाकिस्तानचा संघ जिंकला तर बाबर आझम आणि कंपनी १० गुणांसह दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

न्यूझीलंडने बांगलादेशवर मात केली आणि अफगाणिस्तान पराभूत झाला तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. कारण उपांत्य फेरीच्या स्पर्धेत असलेल्या या तिन्ही सघांमध्ये न्यूझीलंडचा नेट रनरेट सर्वाधिक आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ साखळी फेरीतल्या आपापल्या अखेरच्या सामन्यात जिंकले तर पाकिस्तानला इंग्लंडवर बलाढ्य विजय मिळवावा लागेल.

हे ही वाचा >> Glenn Maxwell : द्विशतकवीर मॅक्सवेलचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक; म्हणाला, “माझ्या अख्ख्या आयुष्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या बाजूला इंग्लंडचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं असलं तर पाकिस्तानविरुद्धचा सामना इंग्लंडसाठीदेखील खूप महत्त्वाचा आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या क्वालिफिकेशनसाठी इंग्लंडला हा सामना जिंकावा लागणार आहे.