Shikhar Dhawan World Cup 2023: आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची मंगळवारी कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी घोषणा केली. केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे संघातील स्थान निश्चित करण्यात आले तर, लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा यांचा मात्र संघात समावेश केलेला नाही. याशिवाय १० वर्षात पहिल्यांदाच आयसीसीच्या वनडे मधून शिखर धवनला वगळण्यात आले आहे. अष्टपैलू धवनला वगळण्याचा निर्णय क्रिकेटप्रेमींसाठी नक्कीच आश्चर्याचा धक्का होता. संघातून बाहेर पडल्यानंतर शिखर धवन आता उज्जैन येथे महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिखर धवनने महाकाल मंदिरातील भस्म आरतीत सुद्धा सहभाग घेतल्याचे समजतेय. व्हायरल व्हिडिओमध्ये शिखरच्या मागेच अक्षय कुमार सुद्धा महादेवाच्या भक्तीमध्ये लीन झाल्याचे पाहायला मिळतेय. अक्षय कुमार त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी गेला होता. मीडियाशी बोलताना धवनने सांगितले की” मी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. संपूर्ण भारत टीम इंडियाच्या यशासाठी प्रार्थना करत आहे आणि मी सुद्धा आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे.”

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
jalgaon gold price marathi news
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याची ७५ हजारांकडे वाटचाल
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!

शिखर धवनने संघात निवड न झाल्याचा राग मनात न धरता, संघाच्या घोषणेनंतर सुद्धा निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करत ट्वीट केले होते. धवनने ट्वीटमध्ये म्हटले होते की, “वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेल्या माझ्या सहकाऱ्यांचे आणि मित्रांचे अभिनंदन! १.५अब्ज लोकांच्या प्रार्थना आणि पाठिंब्याने तुम्ही आमच्या आशा आणि स्वप्न पूर्ण करावीत अशी आशा करतो. तुम्ही वर्ल्डकप घरी परत आणून आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी कराल. गो, टीम इंडिया!”

दरम्यान, आशिया चषक २०२३ च्या संघाची घोषणा करताना आगरकर म्हणाले होते, “शिखर भारतासाठी एक उत्कृष्ट खेळाडू आहे. पण संघात सध्या १५ च जणांची जागा आहे त्यामुळे कोणाला ना कोणाला मागे रहावेच लागेल. “

हे ही वाचा<< IND vs PAK मध्ये भाव खाऊन गेलेला ‘हा’ खेळाडू दुसऱ्यांदा करणार लग्न; कारणही खास, कोण आहे नवरी, वाचा

भारताचा विश्वचषक 2023 संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बी. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.