WPL 2023 RCB vs GG Updates: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीग (WPL) चा १६ वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १८८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आरसीबी संघासमोर १८९ धावांच लक्ष्य ठेवले.

प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या सोफी डिव्हाईनने गुजरात जायंट्सला पहिला धक्का दिला आहे. तिने तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तिने सोफिया डंकलीला क्लीन बोल्ड केले. डंकलेने १० चेंडूत १६ धावा केल्या. यादरम्यान तिने तीन चौकार मारले. प्रीती बोसने गुजरातला दुसरा धक्का दिला. तिने सबिनेनी मेघनाला यष्टिरक्षक रिचा घोषने यष्टिचित केले. मेघनाने ३२ चेंडूत ३१ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

लॉरा वोल्वार्डने झळकावले वादळी अर्धशतक –

लॉरा वोल्वार्डने गुजरात जायंट्ससाठी सर्वाधिक धावांची खेळी साकारली. तिने ४२ चेंडूचा सामना ९ चौकार आणि २ षटकार लगावत ६८ धावांची खेळी केली. तिला श्रेयंका पाटीलने तिला झेलबाद केले. लॉराचा झेल प्रीतीने घेतला. त्यानंतर अॅशलेघ गार्डनरने २६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. ज्यामध्ये ६ चौकार आणि एक षटकार लगावला.

शेवटच्या षटकात गुजरात जायंट्सकडून तुफान फटकेबाजी –

शेवटच्या षटकात हरलीन देओल आणि दयालन हेमलता यांनी तुफानी फलंदाजी केली. दोघींनी मिळून नऊ चेंडूत २७ धावांची भागीदारी केली. हेमलताने सहा चेंडूंत १६ धावा करून नाबाद राहिली आणि हरलीन देओलने पाच चेंडूंत १२ धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने दोन बळी घेतले. सोफी डिव्हाईन आणि प्रीती बोस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा – IPL 2023: रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद कसे मिळाले? अनिल कुंबळेंनी केला मोठा खुलासा

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: सोफी डेव्हाईन, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कसाट, मेगन शुट, आशा शोभना, प्रीती बोस.

गुजरात जायंट्स: सोफिया डंकले, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, ऍशले गार्डनर, दयालन हेमलता, सबिनेनी मेघना, सुषमा वर्मा (विकेटकीपर), किम गर्थ, स्नेह राणा (कर्णधार), तनुजा कंवर, अश्विनी कुमारी.