WPL 2023 Anthem Song: महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राला आज (४ मार्च) धमाकेदार सुरुवात होत आहे. या ऐतिहासिक लीगच्या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे. बॉलीवूड सुपरस्टार क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी यांच्याशिवाय गायक एपी ढिल्लन परफॉर्म करणार आहेत. त्याचवेळी, याआधी बीसीसीआयने स्पर्धेचे अँथम सॉंग रिलीज केले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर हे सॉंग व्हिडिओ शेअर केले आहे.

जय शहा यांनी अँथम सॉंग रिलीज केले

जय शाह यांनी शुक्रवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वुमेन्स प्रीमियर लीगचे अँथम सॉंग रिलीज केले. शाह यांनी व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, ‘#TATAWPL अँथम सॉंग शेवटी आले आहे! महिला प्रीमियर लीगचा सलामीचा सामना सुरू होताच ऊर्जा आणि उत्साहाचे साक्षीदार व्हा! #YehTohBasShuruatHai! या गाण्यात प्रसिद्ध गायक शंकर महादेवनसह ६ कलाकारांनी आपला आवाज दिला आहे. या व्हिडिओत शफाली वर्माही दिसत आहे.

मुंबई इंडियन्सने देखील अँथम सॉंग केले रिलीज

महिला प्रीमियर लीग २०२३ आजपासून म्हणजेच ४ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे. त्याचवेळी, या सामन्यापूर्वी, ३ मार्च रोजी, मुंबईने WPL २०२३ साठी आपले अँथम सॉंग रिलीज केले आहे, ज्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघातील इतर खेळाडू देखील उत्साहाने भरलेले दिसत आहेत. त्याचवेळी या फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानीही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ३० सेकंदाचा हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “ती आली रे… एक गाना, एक आवाज, एक क्रांती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिला सामना मुंबई आणि गुजरात यांच्यात होणार आहे

WPL २०२३ हंगामाचा पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. गुजरातने बेथ मुनीला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. तर मुंबई इंडियन्सची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती असेल. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि यूपी वॉरियर्स या एकूण पाच संघांनी भाग घेतला आहे. या ५ संघांमधील सर्व २२ सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील.