Deaf and mute wrestler Virender Singh expressed his disappointment : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे देशातील अव्वल खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले. या यादीत क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह अनेक खेळाडूंच्या नावाचा समावेश होता. दरम्यान, एका कुस्तीपटूने एक्सवर निराशा व्यक्त केली आणि त्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. मूक-बधिर ऑलिंपियन वीरेंद्र सिंगला त्याचे नाव खेलरत्न पुरस्कारासाठी नाकारण्यात आल्यानंतर निराशा आवरता आली नाही.

२०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या वीरेंद्रने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग केले. कारण त्याने प्रतिष्ठित खेलरत्न, भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान न मिळाल्याबद्दल निराशा व्यक्त केली. वीरेंद्र हा अर्जुन पुरस्कारप्राप्त असून हरियाणा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले आहे.

Everyone is not Shubman Gill to have a good zodiac sign Kris Srikkanth backed Ruturaj Gaikwad
IND vs SL : ‘प्रत्येकाचे नशीब शुबमन गिलसारखे…’, ऋतुराज गायकवाडला संघातून वगळल्याने माजी दिग्गज संतापला
PV Sindhu opinion is that golden success is the only goal in Olympics sport news
ऑलिम्पिकमध्ये सोनेरी यशाचेच ध्येय -सिंधू
How Many Medals Neeraj Chopra Won For India
Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज! जाणून घ्या नीरज चोप्राने आतापर्यंत किती पदकं जिंकली आहेत?
BCCI to release INR 1 crore for Anshuman Gaekwad's cancer treatment
कॅन्सरशी लढा देणाऱ्या अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयतर्फे मदत जाहीर
ICC Player of the Month Award for June 2024
बुमराह-स्मृतीने रचला इतिहास, पहिल्यांदाच एका देशाच्या दोन खेळाडूंनी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारावर कोरले नाव
Rohit Sharma on Koi Garden ghuma kya question
VIDEO: टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये कोणी गार्डनमध्ये फिरलं का? रोहित शर्मा म्हणाला, “मला असा संघ मिळाला…”
Suryakumar Yadav Reveals Dravid Thank Rohit sharma After India win
“नोव्हेंबरमधील त्या फोन कॉलसाठी थँक्यू रोहित…”, द्रविड यांनी वर्ल्डकप जिंकल्यानंतर कॅप्टनचे आभार का मानले? सूर्यकुमारने केला खुलासा
Suryakumar Yadav Special Post For Captain Rohit Sharma
सूर्यकुमार यादवची रोहित शर्मासाठी खास पोस्ट, आभार मानत म्हणाला, “कॅप्टन रो…”

त्याने एक्सवरील पोस्टमध्ये लिहले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर मला ५ डेफ ऑलिम्पिक पदके जिंकूनही खेलरत्न देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर हरियाणा सरकारने आपल्या धोरणानुसार आठ कोटी रुपयेही दिलेले नाहीत. माझा गुन्हा एवढाच आहे की, मी दिव्यांग खेळाडू आहे. जय हिंद.”

हेही वाचा – Praveen Kumar : “ते खूप जास्त करायचे…”, ‘बॉल टॅम्परिंग’बाबत माजी भारतीय गोलंदाजाचे वक्तव्य

पीएम मोदींनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांनी सन्मानित केलेल्या खेळाडूंचे कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये लिहले, ‘राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार २०२३ च्या अद्भूत विजेत्यांचे अभिनंदन. त्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि अखंड समर्पण हे आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर जागतिक व्यासपीठावर भारताचा ध्वजही उंचावला आहे.’

हेही वाचा – शिखर धवनने सांगितले लोकांचे लग्न न करण्यामागचे मजेदार कारण, VIDEO होतोय व्हायरल

भारताची स्टार बॅडमिंटन पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी, तिरंदाज ओजस प्रवीण देवतळे, शीतल देवी आणि आदिती गोपीचंद स्वामी आणि कुस्तीपटू अनंत पंघल यांसारख्या खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.