WTC 2023 Final India vs Australia: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ४४४ धावांच्या विक्रमी धावांचा पाठलाग करताना अपयश आले. आजपर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतक्या धावांचा पाठलाग झालेला नाही. मात्र, भारतीय संघ सध्या ज्या स्थितीत होता त्यांना ते अवघड नव्हते. मात्र ठराविक अंतरावर विकेट्स पडल्याने भारताला विजय साकारता आला नाही. यावर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी त्यांचे मत मांडले आहे की, “जर ऋषभ पंत संघात असता तर हा चमत्कार घडण्याची अधिक शक्यता होती.”

४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवशी ३ गडी गमावून १६४ धावा केल्या होत्या. आज पाचव्या दिवशी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे खेळायला उतरले. मात्र विराट कोहली केवळ ४९ धावा करू शकला तर अजिंक्य रहाणे देखील ४६ धावा करून बाद झाला. भारताला तब्बल २०९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत कोहली आणि रहाणेच्या जोडीवर खूप दडपण होते. त्यानंतर केएस भरत, रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरसारखे फलंदाज होते. मात्र ते देखील मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं

हेही वाचा: WTC2023-25: WTC फायनल संपताच पुढील सायकलची झाली घोषणा, ‘या’ संघांशी भिडणार टीम इंडिया, ICC केले वेळापत्रक जाहीर

पंतच्या उपस्थितीने टीम इंडियाला जिंकण्याची अधिक संधी होती- संजय मांजरेकर

जर टीम इंडियाने हा सामना जिंकला असता तर तो चमत्कारापेक्षा कमी नसता मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, ऋषभ पंत संघात असता तर जिंकण्याची शक्यता अधिक होती, असे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. ईएसपीएन क्रिकइन्फोवर झालेल्या संवादादरम्यान मांजरेकर म्हणाले, “जर ऋषभ पंत असता तर या टीम इंडियाला हा विजय मिळवणे अधिक शक्य झाले असते. जर भारतीय संघ जिंकला तर तो चमत्कारच असता. मात्र, परभवामुळे पंतची कमतरता अधिक भासू लागली आहे. त्या एकाच खेळाडूमुळे लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या असत्या.”

हेही वाचा: WTC Final 2023: कोणाच काय तर कोणाच…; एका बाजूला टीम इंडिया संकटात दुसरीकडे लाइव्ह सामन्यात प्रेयसीला केले प्रप्रोज, Video व्हायरल

ऋषभ पंतच्या अपघातानंतर टीम इंडियाला एका चांगल्या यष्टिरक्षकाची कमतरता भासू लागली. त्याच्या जागेवर WTC फायनलमध्ये के एस भरतला संधी देण्यात आली. मात्र त्याला दोन्ही डावात मिळून केवळ २८ धावा करता आल्या. टीम इंडियाला खालच्या फळीत एका चांगल्या यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे . सध्या टीम इंडिया भरत बरोबर इशान किशनला देखील संधी देण्याच्या विचारात आहे. परंतु ऋषभ पंत बरा होईपर्यंत त्याची जागा कोण भरून काढेल हे मात्र येणारा काळच ठरवेल.