scorecardresearch

Premium

WTC 2023 Final: “मुझसे शादी करोगे…”, ओव्हलवर लाईव्ह सामन्यात तरुणीची शुबमनला लग्नाची मागणी, फोटो व्हायरल

Shubman Gill on WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात शुबमन गिलने मोठी चूक केली. भारतीय संघाला विकेट घेण्याची संधी होती पण गिलमुळे ती हुकली. त्यानंतर अचानक स्टँडमधून गिलसाठी लग्नाचा प्रस्ताव आला.

Shubman Gill made a huge mistake on the field Captain Rohit was angry That's why marriage proposal came from the stands
स्टँडमधील एका तरुण चाहतीने शुबमन गिलला लग्नाचा प्रस्ताव दिला. सौजन्य- (ट्वीटर)

Shubman Gill Fan in London: भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. टीम इंडियासाठी अप्रतिम खेळी खेळून गिलने आयपीएल २०२३ मध्ये ऑरेंज कॅप जिंकली. जानेवारीमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध वन डेमध्ये द्विशतक झळकावले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० मध्येही शतक झळकावले. त्यामुळे त्याचे फॅन फॉलोइंगही खूप वाढले आहे. गिल सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे.

लाइव्ह सामन्यात शुबमन गिलला आले लग्नाचे प्रपोजल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला होता. त्यानंतर स्टँडमधील एका तरुण चाहतीने शुबमन गिलला लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने तिची पोस्टर्स आणली होती. त्या पोस्टरवर लिहिले होते, “शुबमन मुझसे शादी करोगे म्हणजे शुबमन माझ्याशी लग्न करणार…” हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

तेव्हाच गिलने मोठी चूक केली

तरुणीने पोस्टर पडद्यावर दाखवण्याआधी आधीच्या एका चेंडूवर शुबमन गिलने मोठी चूक केली. मोहम्मद सिराजचा चेंडू मार्नस लाबुशेनने गलीच्या दिशेने खेळला. तिसर्‍या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना गिलने डायव्हिंग करून चेंडू रोखला. दरम्यान, नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभे असलेले लाबुशेन आणि ख्वाजा धाव यांच्यात घेताना गोंधळ उडाला आणि दोघेही बॅटिंग एंडच्या जवळ पोहोचले. गिलला आरामात उठून थ्रो मारण्याची संधी होती. पण त्याने न बघता चेंडू बॅटिंग एंडच्या दिशेने फेकला. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. अशाप्रकारे भारतीय संघाने धावबाद करण्याची सोपी संधी गमावली.

दुसऱ्या डावात गिलकडून अपेक्षा

दुसरीकडे, शुबमनच्या सामन्यातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने पहिल्या डावात चाहत्यांना निराश केले. गिल पहिल्या डावात १५ चेंडूंत १३ धावा करून बाद झाला. गिलला स्कॉट बोलँडने त्रिफळाचीत केले. आता दुसऱ्या डावात टीम इंडियाला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कारण भारताला फायनल जिंकायची असेल तर मोठे लक्ष्य गाठण्यासाठी त्याच्या बॅटमधून शतकी खेळी येणे आवश्यक आहे.

हेही वाचा: WTC 2023 Final: वयाच्या तिसर्‍या वर्षी हातात बॅट घेणारा शुबमन भारताचा नवा स्टार, रोहित-द्रविडने बांधले कौतुकाचे पूल

ऑस्ट्रेलियाने ४०० धावांची भक्कम आघाडी घेतली आहे

ऑस्ट्रेलियाच्या एकूण आघाडीने ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. कांगारू संघाने पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी घेतली होती तर दुसऱ्या डावात सहा गडी गमावून २२९ धावा केल्या होत्या. यासह ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ४०० धावांच्या पुढे गेली आहे. आता या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणे भारतासाठी अत्यंत कठीण होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 18:44 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×