वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला वगळण्यात आले होते. ७ ते ११ जून दरम्यान होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. रहाणेशिवाय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचेही संघात पुनरागमन झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. त्याच्यासोबत टीममध्ये शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रहाणे आणि केएल राहुल आहेत. केएस भरतची विशेषज्ञ यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फिरकी विभागाची जबाबदारी रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर असेल.

हेही वाचा: Breat Lee on Arjun: अर्जुन तेंडुलकर बनू शकतो स्पीडचा बादशाह! ब्रेट लीने दिला सल्ला, म्हणाला, “ते कीबोर्ड योद्धे असून तुझ्या वडिलांच्या…”

वर्ल्ड टेस्टचॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाच्या निवडीवर हर्षा भोगलेंचे प्रश्नचिन्ह

चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल २०२३ गाजवत असलेल्या अजिंक्य रहाणेला १७ महिन्यांनंतर कसोटी संघात पुन्हा घेण्याचा शहाणपणा बीसीसीआयने दाखवला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर संघाबाहेर असलेल्या रहाणेने स्थानिक स्पर्धांमध्येही शानदार कामगिरी करून बोर्डाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले होते. पण, बीसीसीआयने वार्षिक करारातून त्याला हटवले आहे. टीम इंडियाच्या या निवडीवर समालोचक हर्षा भोगले यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.

भोगले म्हणाले की, “जर के. एल. राहुलचा यष्टिरक्षक म्हणून बीसीसीआय विचार करत असेल तर कसोटीत त्याला हे कितपत जमेल यात शंका आहेच. के. एस. भरतला संघात घेतल्यास एका फलंदाजाचा बळी द्यावा लागेल हे निश्चित आहे अन् जर भरतला दुखापत झाली, तर रिप्लेसमेंट म्हणून यष्टिरक्षकाचा पर्याय बीसीसीआयने निवडलेलाच नाही.” ते पुढे म्हणाले की, “जर भारतीय संघाला फलंदाजी मजबूत करण्यासाठी जर के. एल. राहुलचा यष्टिरक्षक म्हणून विचार करायचा असेल, तर त्याने सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलमध्येही यष्टिरक्षण करायला सुरुवात केली पाहीजे. कसोटी क्रिकेट हे पूर्णपणे वेगळे आहे, परंतु त्यासाठी त्याने यष्टिमागे उभं राहून त्याची तयारी करायला हवी.”

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final harsha bhogle questioned the selection of team india what exactly did you say find out avw
First published on: 25-04-2023 at 20:10 IST