Yuzvendra Chahal on Team India: भारताचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी निवड झालेली नाही. त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली, पण तो दुखापतीमुळे बाहेर पडला. आता अक्षराच्या जागी रविचंद्रन अश्विन संघात सामील झाला आहे. २०१६ मध्ये पदार्पण केल्यापासून चहल एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी तिसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. फिरकीपटूंबद्दल जर बोलायचे झाले तर तो या यादीत फक्त कुलदीप यादवच्या मागे आहे. असे असतानाही चहलला सलग तिसऱ्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही, यामुळे तो खूप दुःखी आहे.

युजवेंद्र चहल २०२१ आणि २०२२च्या टी२० वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नव्हता. आता त्याची भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातही निवड झाली नाही. चहल हा २०२२च्या टी२० विश्वचषक संघाचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयांची त्याला सवय झाली आहे. एका मुलाखतीत चहलने कबूल केले की, त्याला समजले आहे की केवळ १५ खेळाडू संघात स्थान मिळवू शकतात आणि म्हणूनच त्याने व्यवस्थापनाचा निर्णय स्वीकारला.

विराट कोहलीच्या जिव्हारी लागली ‘ती’ विकेट! चाहत्याने प्रश्न विचारतच एका सेकंदात दिली प्रतिक्रिया, पाहा Video
Will MS Dhoni play in T20 World Cup 2024
Team India : एमएस धोनी टीम इंडियात परतणार? टी-२० विश्वचषकाबाबत ‘या’ माजी खेळाडूंचा मोठा दावा
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

हेही वाचा: Asian Games 2023: अदिती अशोकने एशियन गेम्समध्ये रचला इतिहास, गोल्फमध्ये पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला

मला थोडं वाईट वाटतंय: युजवेंद्र चहल

रिस्ट स्पिनर युजवेंद्र चहल म्हणाला, “मला समजते की केवळ पंधरा खेळाडू संघाचा भाग असू शकतात. विश्वचषकात तुमच्याकडे १७ किंवा १८ खेळाडू असू शकत नाहीत. मला थोडं वाईट वाटतंय, पण आयुष्यातील माझे ध्येय पुढे जाणेहे आहे. आता माझ्याकडे एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे अधिक मेहनत करत स्वतःला सकारात्मक ठेवणे. आता मला नकाराची सवय झाली आहे. तीन विश्वचषक झाले आहेत आणि त्यात हेच चित्र पाहायला मिळाले,” हे सर्व तो हसत हसत बोलला.

भारतीय संघातील इतर फिरकीपटूंबरोबर तुझी कोणाशी स्पर्धा आहे? यावर चहल म्हणाला, “मी याबद्दल जास्त विचार करत नाही, कारण मला माहित आहे की जर मी कामगिरी केली तर मी पुन्हा संघासाठी खेळेन. भविष्यात तुमची जागा कोणीतरी घेईल, याचा विचार मी आता करत बसत नाही ती वेळ कधीतरी येईलच.”

भारताने सुरुवातीला अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंचा संघात समावेश केला होता. अक्षराच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनची निवड करण्यात आली. मात्र, अश्विनने गेल्या काही वर्षांत भारतासाठी एकदिवसीय सामने खेळले नाहीत. चहलला संधी मिळू शकली असती, पण त्याच्या नावाचा विचारही झाला नाही. असे असूनही चहलला संघाने विश्वचषक जिंकावा असे वाटते.

हेही वाचा: World Cup 2023: इकॉनॉमी क्लासमध्ये इंग्लंडने केला ३८ तासांचा प्रवास अन् सामन्यावर पावसाने फिरवले पाणी; बेअरस्टो नाराज

हा वैयक्तिक खेळ नाही: चहल

चहल पुढे म्हणाला, “भारताने विश्वचषक जिंकला पाहिजे, हेच मुख्य ध्येय आहे, कारण हा वैयक्तिक खेळ नाही. मी जरी संघाचा भाग असलो किंवा नसलो तरी ते माझ्या भावांसारखे आहेत. साहजिकच मी भारतीय संघाला पाठिंबा देतो. मी भारतीय आहे आणि मला आव्हाने आवडतात. ही आव्हाने मला सांगतात की आणखी कष्ट करावे लागतील जेणेकरून मी संघात परत येऊ शकेन.” अनेक माजी क्रिकेटपटूंनीही चहलचे समर्थन केले असून या फिरकीपटूला विश्वचषक संघातून वगळणे भारतीय संघाला महागात पडू शकते, असे म्हटले आहे.