अर्चना जोशी

नवीन वर्षांच्या स्वागतासाठी घरी पार्टी आयोजित करणार असाल, तर सजावटीचा विचार सुरू केला असलेच. पार्टीसाठी पदार्थ, आमंत्रणे, पाहुण्यांसाठी भेटवस्तू अशी सगळी तयारी करताना बराच खर्च होतो. पण घरच्या घरी एखादी कलाकृती तयार केल्यास सजावटीवरचा थोडासा खर्च कमी करता येईल.  नववर्षांसाठी भिंतीवर लटकवण्याचे शुभेच्छापत्र तयार करू या.

साहित्य

* लहान-मोठय़ा आकाराच्या कागदी प्लेट, कागद, जलरंग, स्केचपेन, गम, कात्री (झिगझॅग), सुशोभानाचे साहित्य, सॅटीनची पट्टी, सेलोटेप इत्यादी.

कृती

* एका रंगीत कागदावर गोलात हलक्या हाताने चित्र काढा किंवा सुंदर अक्षरात संदेश लिहा.

* रंगवा व सुशोभन करा.

* गोलाकारात कापा व आतील बाजूस कागदी प्लेटला चिकटवा.

* पेपर प्लेटच्या बाहेरील बाजूच्या उंचसखल भाग कात्रीने कापा.

*  बाहेरील गोलाकार बाजूस झिगझॅग कात्रीने कापा.

*  एका आड एक पट्टी आतील बाजूस दुमडा.

* आतील बाजूस दुमडलेल्या पट्टय़ांना स्केचपेनने रंगवून त्यांना हिरव्या पानांचा लुक द्या.

* मागील बाजूस सॅटीनची पट्टी सेलोटेपने चिकटवा.

* भिंतीवर किंवा दरवाजा वर लावा.

* भेट म्हणूनसुद्धा उपयोग होईल.