27 February 2021

News Flash

जुने स्पीकर होणार Alexa प्रमाणे स्मार्ट, अॅमेझॉनने लाँच केलं Echo Input

या छोट्या डिव्हाइसमुळे साधारण जुने स्पीकर देखील 'अॅलेक्सा'प्रमाणेच स्मार्ट होणार, किंमत फक्त...

अग्रगण्य ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनने आज भारतात Echo Input हे एक नवं डिव्हाइस लाँच केलं आहे. या छोट्याशा डिव्हाइसद्वारे तुमच्याकडील साधारण जुने स्पीकर देखील अॅमेझॉनच्या ‘अॅलेक्सा’प्रमाणेच स्मार्ट होतील आणि Alexa डिजीटल व्हॉइस असिस्टंटला सपोर्ट करतील. थोडक्यात काय तर तुम्हाला अॅलेक्सा खरेदी करण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही Echo Input द्वारे घरातील जुन्या स्पीकरचं रुपांतर अॅलेक्साप्रमाणेच करु शकतात.

इको इनपुटसह 3.5mm ऑडिओ केबल देण्यात आली आहे. तुम्ही केबल अथवा ब्ल्युटूथद्वारे इको इनपुटला दुसऱ्या स्पीकर्ससोबत कनेक्ट करु शकतात. यामध्ये चार मायक्रोफोनही आहे, याद्वारे व्हाॉइस कमांड देता येईल. तसंच यात एक मायक्रो युएसबी स्लॉट देखील आहे.

कसं वापरायचं –
इको इनपुट डिव्हाइसला स्पीकर्ससोबत कनेक्ट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अॅलेक्सा अॅप डाउनलोड करणं गरजेचं आहे. या अॅपशिवाय हे डिव्हाइस काम करत नाही. अॅलेक्सा अॅप तुम्ही गुगल अथवा अॅपल स्टोअरवरुन डाउनलोड करु शकतात. या डिव्हाइसमध्ये कोणत्याही प्रकारचा इनबिल्ट स्पीकर नाहीये, त्यामुळे तुमच्याकडील इतर कोणत्याही स्पीकरसोबत कनेक्ट करुनच तुम्ही याचा वापर करु शकतात.

किंमत –
भारतात इको इनपुटची किंमत 2 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावरुन हे खरेदी करता येईल. याशिवाय क्रोमा आणि विजय सेल्स या आउटलेट्समधूनही म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे हे डिव्हाइस खरेदी करता येईल. लवकरच या डिव्हाइसची डिलिव्हरी सुरू होईल असं अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षीच कंपनीने हे डिव्हाइस सादर केलं होतं, पण, जानेवारी 2019 मध्ये हे डिव्हाइस उपलब्ध केलं जाईल असंही जाहीर केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 6:45 pm

Web Title: amazon launches echo input which will turn speaker into alexa based speaker
Next Stories
1 बुटांच्या जगातही डिजीटल युग ! Nike चे ऑटोमॅटिक फिटिंग Smart शूज
2 मधुमेह आणि स्थूलता अनुवंशिक आहे?
3 भारतीयांना कोणत्या रंगाच्या कार आवडतात माहितीये ?
Just Now!
X