लहान मुलांना दंड बैठका, सूर्यनमस्कार अशा प्रकारच्या व्यायामासाठी प्रवृत्त करणे लठ्ठपणाविरोधात फायदय़ाचे असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे.

ज्या व्यायामामुळे स्नायूंवर ताण पडतो त्याचप्रमाणे हाडे आणि स्नायू बळकट होतात अशा व्यायाम प्रकारांमुळे लहान मुलांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे या व्यायाम प्रकारांमुळे स्नांयूंची वाढ होत असून लहान मूलांमधील चयापचयाची क्रिया आणि ऊर्जेचे प्रमाण वाढते. अभ्यासात आढळलेले हे परिणाम कमी प्रमाणात असले तरी महत्त्वाचे असल्यामुळे या दिशेने अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अशा व्यायामामुळे लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येवर तोडगा निघू शकतो.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

ब्रिटनमधील एडिनबर्ग विद्यापीठ आणि डन्डी विद्यापीठातील संशोधकांनी नऊ ते १८ र्वष वयापर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांवर करण्यात आलेल्या विविध अभ्यासांमधून आढळून आलेल्या माहितीचे विश्लेषण केले.

या अभ्यासात व्यायामामुळे लहान मुलांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होत असून इतर कोणत्याही प्रकारचे बदल म्हणजेच स्नायू, बॉडी मास इंडेक्स, कमरेचा घेर यामध्ये बदल होत नाही. या व्यायाम प्रकारांमुळे लहान मुलांना वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि चरबी कमी करण्यात मदत होत असल्याचे एडिनबर्ग विद्यापीठाच्या हेलन कॉलिन्स यांनी सांगितले.

लहान मुलांमधील लठ्ठपणाचा उपचार, प्रामुख्याने त्याला प्रतिबंध घालणे हा महत्त्वपूर्ण विषय आहे. आमच्या अभ्यासामधून या दिशेने अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम फायदेशीर असल्याचे कॉलिन्स यांनी सांगितले.