News Flash

मेंदूच्या स्कॅनिंगमुळे मानसिक आजार शोधण्यास मदत

मेंदूचा विकार नसलेल्यांना या आजारांपासून दूर ठेवणे शक्य आहे

| April 20, 2018 04:19 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वॉशिंग्टन : मेंदूचे स्कॅनिंग करून मानसिक आजारांचा शोध घेणे सहज शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे मेंदूसंबंधी अन्य आजारांचे निदान करणेही शक्य आहे.

हे संशोधन नुकतेच ‘न्यूरॉन’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. एमआरआय स्कॅनिंगद्वारे मेंदूतील महत्त्वाच्या भागांतील प्राथमिक फरक ओळखणे सहज शक्य होते. मेंदूचा विकार नसलेल्यांना या आजारांपासून दूर ठेवणे शक्य आहे. मेंदूच्या स्कॅनिंगच्या माध्यामातून मेंदूसंबंधी विकार दूर करण्याकडे पहिले पाऊल पडल्याचे वॉशिंग्टन वैद्यकीय विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्हन पीटरसन यांनी सांगितले.

स्कॅनिंगसाठी आम्ही एमआरआय चाचणीचा विकास केला तेव्हा या चाचणीतून नेमके काय साध्य करायचे याचा विचार करणे आवश्यक होते. मात्र, या चाचणीद्वारे वैद्यकीय चाचणी क्षेत्रासाठी नवी कवाडे खुली झाली आहेत, असे पीटरसन म्हणाले.

संशोधकांनी दहा तासांत नऊ नागरिकांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. प्रत्येकाची एक तास तपासणी केल्यानंतर संशोधकांनी वरील निदान केले आहे. चाचणीच्या आधी व्यक्तीचे मानसिक आजार, क्षमता, वाचनाची क्षमता आणि अन्य गुणोंचा विचार करण्यात आला होता. चाचणीत व्यक्तीच्या मेंदूच्या विविध भागांची, बदललेल्या घटकांची माहिती होते. त्याद्वारेच रुग्णाचा आजार शोधणेही शक्य असल्याचा शोध घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 4:19 am

Web Title: brain scanning help in detecting mental illness
Next Stories
1 बंगालमधील पंचायत निवडणुकांत प्रचारासाठी भाजपकडून असीमानंद
2 ८६% टक्के ATM मशीन्स सुरु, रोकड नसलेल्या भागात पोहोचले पैसे
3 केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर विधि सल्लागाराचा आक्षेप!
Just Now!
X