27 November 2020

News Flash

सिताफळ खाल्ल्यामुळे स्त्रियांना होऊ शकतो ‘हा’ फायदा

सहसा सिताफळ हे जेवणानंतर १ ते २ तासांनी खावे

चवीला गोड आणि लहान लहान बिया असलेलं सिताफळ पाहिलं की लगेच त्याला खाण्याचा मोह होतो. खरं तर सिताफळ हे मूळचं वेस्ट इंडिज बेटे आणि दक्षिण अमेरिकेतील फळ. त्यानंतर ते भारतात आलं. सिताफळाची लागवड कोठेही सहज करता येते. अगदी माळरानावरदेखील हे झाडं वाढतं. सिताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये सिताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड अॅपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असं म्हणतात. सिताफळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

औषधी गुणधर्म-

सिताफळामध्ये कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नसíगक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

उपयोग –
१. सिताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सिताफळ खायला दिल्यास त्यांची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते.

२. स्त्रियांच्या आरोग्यासाठीही सिताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर किंवा चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सिताफळाने ही शारीरिक झीज भरून येते. यासाठी सिताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो.

३. आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सिताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

४. कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सिताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशीची वृद्धी होते व वजन वाढीस लागते.

५. ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल. छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सिताफळ खावे.

६. आम्लपित्त, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे.

७.चक्कर आली असल्यास सिताफळाची पाने वाटून त्यांचा रस काढावा व रसाचे थेंब नाकात टाकावेत. रुग्ण शुद्धीवर येतो.

८. सिताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व उवा व लिखाही होत नाहीत.

९. सहसा सिताफळ हे जेवणानंतर १ ते २ तासांनी खावे. सिताफळाच्या गरापासून सरबत बनविता येते. तसेच सिताफळाचे आइस्क्रीमही करता येते.

१०. सिताफळाची पाने वाटून त्याचा रस करावा व यामध्ये थोडे सैंधव घालून त्याचे पोटीस बनवावे हे पोटीस न पिकलेल्या गळवावर लावल्यावर गळू लवकर पिकते तसेच जखमेवर बांधल्यास जखमेतील घाण निघून जाऊन जखम स्वच्छ होते.

११ .अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस थोडय़ा थोडय़ा अंतराने पिण्यास द्यावा

वाचा : बॅचलर पार्टीसाठी जगातली ‘ही’ २६ ठिकाणं आहेत बेस्ट

 सिताफळ खाताना घ्या ही काळजी –

१. ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सिताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सिताफळ खाऊ नये.

२.अतिप्रमाणात सिताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते.

३. सिताफळाच्या बियांची पूड डोक्यावर लावताना ही पूड डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्यावी. कारण याने डोळ्यांची आग होऊन विकार निर्माण होऊ शकतात.

४.सहसा सिताफळ हे दुपारच्या वेळेमध्ये खावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 2:21 pm

Web Title: custard apple sharifa is beneficial in making the fetal brain and immune system effective in pregnancy ssj 93
Next Stories
1 तीन दिवस बँका बंद, तातडीनं करा महत्त्वाची कामं
2 जुने iPhones वापरणाऱ्या Apple युजर्ससाठी गुड न्यूज
3 त्वचेतील प्रथिनांमुळे वाढलाय कर्करोगाचा धोका
Just Now!
X