एक तास कसून व्यायाम केल्यावर जर हृदयाच्या ठोक्यांचा दर त्याच्या सर्वाधिक क्षमतेच्या ६० ते ७० टक्के झाला तर दोन-तीन तास साधारण स्वरूपाच्या व्यायामापेक्षाही हा एक तास केलेला व्यायाम फायदेशीर ठरत असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.
त्यामुळे व्यायाम कमी वेळ केला तरी चालेल पण, कसून व्यायाम करा असा सल्ला या संशोधकांनी दिला आहे. याची एक चाचणीही घेण्यात आली. शरीरातील चरबी, वजन, कोलेस्ट्रोल आणि कंबरेचा घेर या गोष्टींवर या चाचणी दरम्यान लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. काही जणांचे गट तयार करून एका गटाला ३० दिवसांसाठी कमी वेळ पण, कसून व्यायाम करण्यास तर, उर्वरित गटाला सर्वसाधारण दोन ते तीन तास व्यायास करण्यास सांगितले होते. त्यादरम्यान, कमी परंतु, कसून व्यायाम केलेल्या गटातील व्यक्तींच्या आरोग्यात दुसऱया गटातील व्यक्तींपेक्षा जास्त सुधारणा झालेली दिसून आली. शरीरातील कोलेस्ट्रोल कमी होण्यसाठी दोन-तीन तास चालणाऱयांच्या शरीरातील कोलेस्ट्रोल जितके कमी होते. तितकेच अर्धा ते एक तास कसून व्यायाम करणाऱयांच्या शरीरातील होते. असेही या चाचणीतून समोर आले. त्यामुळे व्यायाम कमी केला तरी चालेल, पण कसून करा..