News Flash

असं ओळखा बनावट जिरं!

पदार्थाची चव वाढविण्यासोबतच जिऱ्याचे शरीरासाठीदेखील अनेक फायदे आहेत

मसाल्याचा पदार्थातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जिरं. मसालेभात, जिराराईस, डाळ फ्राय या पदार्थांमध्ये जिरं हे आवर्जुन लागतंच. पदार्थाची चव वाढविण्यासोबतच जिऱ्याचे शरीरासाठीदेखील अनेक फायदे आहेत. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, अन्नपचन योग्यरित्या होण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातो. उपयोगी असणारं जिरं तसं महाग असतं. त्यामुळे बऱ्याच वेळा विक्रेते त्यात भेसळ करुन विकतात.मात्र अनेकदा जिऱ्यातील भेसळ कशी ओळखावी हे समजतं नाही. परंतु आता जिरं खरं आहे की बनावट घरच्या घरी ओळखता येईल.

जवळपास ४ हजार वर्षांपूर्वी सीरिया आणि पूर्वी इजिप्तमधील एका संशोधनात जिऱ्याचा शोध लागला. त्याकाळी याचा वापर मसाला आणि मम्मीजचं संवर्धन करण्यासाठी केला जायचा. त्यानंतर त्याचा व्यापारात देवाणघेवाण करण्यासाठी वापर केला जाऊ लगाला. जिरं हे विविध प्रकारात आढळतं. उदाहरणार्थ, काळं जिरं, हिरवं जिरं आणि पांढरं जिरं. मात्र बऱ्याच वेळा काळं जिरं आणि पांढऱ्या जिऱ्यामध्ये भेसळ करण्यात येते.

बनावट जिरं तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या गवताचा वापर केला जातो. हे गवत गुळाच्या पाण्यात भिजवून नंतर ते वाळवलं जातं. गुळाच्या पाण्यात गवत भिजवल्यामुळे त्याचा रंग जिऱ्याप्रमाणे होतो. त्यानंतर या बनावट जिऱ्याला चकाकी येण्यासाठी त्याला दगडाच्या पावडरसोबत मिसळले जाते. मात्र हे बनावट जिरं घरच्या घरी ओळखणं अत्यंत सोपं आहे.

कसे ओळखाल बनावट जिरे?

जिरं बनावट आहे की खरं हे ओळखण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात काही जिरे टाका. जर जिरं बनावट असेल तर ते पाण्यात विरघळायला लागेल आणि त्याचा रंग निघायला सुरुवात होईल. जर जिऱ्याचा रंग निघाला तर हे जिरं बनावट आहे. कारण खऱ्या जिऱ्याचा रंग कधीच बदलत नाही.

जिऱ्याचे फायदे –
१.पचनक्रिया सुधारते
२. केसांच्या वाढ होते
३. ताप आल्यास गुणकारी
४. सर्दी दूर करण्यासाठी
५. पोटदुखीवर गुणकारी
६. उलटी येत असल्यास
७. सांधेदुखी
८. कॉलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यासाठी

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 3:16 pm

Web Title: how to find duplicate cumin seed ssj 93
Next Stories
1 भारतात Amazon ची इ-रिक्षा लाँच, ‘या’ कामासाठी करणार वापर
2 Samsung ची भन्नाट ऑफर, TV खरेदीवर 77 हजारापर्यंतचा स्मार्टफोन Free
3 Video: पुरणपोळी, मोदक, गुलाबजाम आइस्क्रीम्सची ‘पेशवाई थाळी’
Just Now!
X