News Flash

भांड्यावरील स्टिकर निघत नसेल तर वापरा या ५ सोप्या टिप्स

बऱ्याच वेळा भांडी किती ही वेळा वापरली तरी ते स्टिकर निघतं नाही. तर स्टिकर काढण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा भांड्यावर ओरखडे देखील पडतात.

स्टिकर काढण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा भांड्यावर ओरखडे देखील पडतात.

जेव्हा तुम्ही नवीन भांडी खरेदी करतात, तेव्हा बऱ्याच भांड्यांवर कंपनीच्या नावाचे स्टीकर असतात. बऱ्याच वेळा भांडी किती ही वेळा वापरली तरी ते स्टिकर निघतं नाही. ते काढून टाकण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा भांड्यावर ओरखडे देखील पडतात. परंतु त्यांना काढण्याचा प्रयत्न हा अयशस्वी ठरतो. भांड्यांवरचे स्टिकर काढण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स नक्कीच वापरून पाहा.

आणखी वाचा : तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा

१. नेल पेंट रीमूव्हर वापरा
नवीन भांड्यावरचे स्टिकर काढण्यासाठी नेल पेंट रीमूव्हर वापरू शकता. त्यासाठी कापसावर नेल पेंट रिमूव्हर किंवा स्पिरिट लावा आणि पाच मिनिटे त्या स्टिकरवर ठेवा. त्यानंतर स्टिकर काढा.

२. गरम पाण्याचा वापर करा
नवीन भांड्यावरचे स्टिकर काढण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. यासाठी आपण भांड्यात गरम पाणी घाला आणि थोडा वेळ असे ठेवा. त्यानंतर स्टिकर काढा. त्याने सहजपणे स्टिकर निघेल. काचेच्या पात्रात गरम पाणी वापरू नका हे लक्षात घ्या.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणानंतर गॅसचा त्रास होतं आहे का? जाणून घ्या कारण आणि उपाय

३. डिटर्जंटचा वापर करा
आपण स्टिकर काढण्यासाठी डिटर्जंटची मदत घेऊ शकता. यासाठी, एक चमचा डिटर्जंट घ्या आणि स्टिकरवर लाव. यानंतर, कपड्याच्या मदतीने काही सेकंद स्टिकरवर चोळा म्हणजे ते पूर्णपणे ओले होईल. त्यानंतर, दहा मिनिटे असे ठेवा. नंतर स्टिकर काढा.

४. अल्कोहोलचा वापर करा
नवीन भांड्यातून स्टिकर काढण्यासाठी अल्कोहोलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी कपड्यावर अल्कोहोल घ्या आणि त्याने स्टिकरवर स्क्रॅच करा. यामुळे लगेच स्टिकर निघेल.

आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

५. तेलाचा वापर करा
नवीन भांड्याला असलेले स्टिकर काढण्यासाठी एक कपड्यावर तेल घ्या. स्टिकरच्या भागावर त्याने स्क्रॅच करा. यानंतर स्टिकर काढा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 7:36 pm

Web Title: how to remove sticker from pot or utensils dcp 98
टॅग : Lifestyle
Next Stories
1 रात्रीच्या जेवणानंतर गॅसचा त्रास होतं आहे का? जाणून घ्या कारण आणि उपाय
2 वर्षभराच्या अखेरीस Noise लाँच करणार प्रीमियम स्मार्ट वॉच
3 वाहनांचे ‘आरोग्य’ही बिघडतंय!