बदलत्या ऋतुचक्रानुसार आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारं ऊन आणि उष्णतेच्या तीव्र झळा माणसाला असहाय्य करत आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा, घशाला पडणारी कोरडं आणि सतत अंगाला येणारा घाम यामुळे सारेच जण त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या उष्णतेपासून सुटका करण्यासाठी सहाजिकच आपली पावले आपोआप थंडगार पदार्थांकडे वळली जातात. मग कोल्ड्रिंक्स, आइस्क्रीम यासारखे पदार्थांकडे आपला कल वाढतो. मात्र डोळ्यांना थंड वाटणारे हे पदार्थ प्रत्यक्षात गरम आहेत. ज्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. परिणामी, शरीरातील उष्णता कमालीची वाढते. या उष्णतेपासून सुटका करुन घेण्यासाठी शरीराला नैसर्गिक थंडावा देणाऱ्या पदार्थाचं सेवन करण्याची गरज असते. त्यामध्ये पाणीदार फळांचा रस, ताक,दही यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ सर्वात फायदेशीर ठरणारं आहे. विशेष म्हणजे कलिंगडापासून केवळ थंडावाच मिळत नाही तर वजनदेखील कमी होतं. त्यामुळे या उन्हाळाच्या सुट्टीमध्ये तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कलिंगडाचे सेवन तुमच्यासाठी वरदान ठरेल.

१. जेवण करण्यापूर्वी रोज कलिंगडाच्या काही फोडी खात जात. कलिंगडाच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यासोबतच पोटदेखील भरतं. पोट भरल्यामुळे आपण प्रमाणात जेवतो. परिणामी, शरीरात वाढणाऱ्या अतिरिक्त फॅट्सला आळा बसतो.

२. वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे फॅट्स. कलिंगड खाल्ल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यासोबतच शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. कलिंगडाच्या रसामध्ये सिटूलाइन असल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

३. कलिंगडामुळे केवळ शरीराला थंडावाच मिळत नाही तर हृदयविकाराच्या झटक्यापासून देखील आपलं संरक्षण करतं.

४.कलिंगडात असलेल्या सिटूलाइनमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो. कलिंगडामुळे तुमची किडनी सुरक्षित राहण्यासाठी मदत होते. कलिंगड हे एक अँटिऑक्सिडेंटसुद्धा आहे.

५. उन्हापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी हे फळ खूप मदत करते. आपल्या शरीरामध्ये असणारे मऊ स्नायूंना कलिंगडामुळे बराच फायदा होत असतो. कलिंगडमुळे अनेकदा लघुशंका होते. पण त्यामुळेच शरीरामध्ये तयार झालेली घाण आपल्याला शरीराबाहेर काढता येते.