News Flash

रात्रीच्या जेवणात भात योग्य की पोळी?; जाणून घ्या कसा असावा रात्रीचा आहार

भात आणि पोळीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत.

भात आणि पोळीचे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत.

आपण रोज जेवणात काय खातो याचा परिणाम हा आपल्या शरिरावर होतो. त्यात भारतीय आहारात भात आणि पोळीचा समावेश असतो. मात्र, संपूर्ण भारताचा विचार केला तर, काही भागांमध्ये पोळी जास्त प्रमाणात खातात तर काही भाागात भात खातात. दरम्यान, भात आणि पोळी या दोघांपैकी रात्री काय खायाला पाहिजे असा प्रश्न नेहमीच सगळ्यांसमोर असतो. या दोघांपैकी रात्री काय खायला हवं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

भात

भातात पोळीच्या तुलनेत फायबर, प्रथिने आणि चरबीचे प्रमाण कमी असते. त्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त आहे. तर, भात खाल्याने लवकरच पोट भरतं नाही. भात हा पचणासाठी अगदी सोपा आहे. परंतु पोळी पचण्यास वेळ लागतो. भातात असलेले जीवनसत्व हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. दरम्यान, बाजारात असलेले बहुतेक तांदळाचे प्रकार हे पॉलिश केलेल असतात त्यामुळे व्हिटॅमिन कमी प्रमाणात मिळतात.

आणखी वाचा : दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ ५ गोष्टींचे सेवन

पोळी

पोळीमध्ये फायबर आणि प्रथिन्यांचे प्रमाण हे जास्त असते. तसेच पोळी खाल्याने तुम्हाला लगेच भूक लागतं नाही. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि सोडियमची प्रमाण जास्त असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुमच्या आहारात चपातीचा समावेश करायला हवा.

आणखी वाचा : लस घेण्याआधी आणि नंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या

मग या दोघांपैकी नक्की काय खालं पाहिजे?

तज्ञ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री भाता ऐवजी पोळी खाणे फायदेशीर ठरु शकते. परंतु पोळी पचण्यास वेळ लागतो. म्हणून रात्री डाळ, भाजी आणि दह्यासोबत पोळी खाऊ शकतात. मात्र, जर तुम्हाला रात्री भात खाण्याची सवय असेल तर तुम्ही रात्री खिचडी खाल्ली पाहिजे. या खिचडीत डाळीचे प्रमाण जास्त असले पाहिजे. मात्र, भात जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 4:19 pm

Web Title: know what is healhtier what should you have in dinner between roti and rice dcp 98
टॅग : Lifestyle
Next Stories
1 ‘सुपर बाइक’चे नवे पर्याय
2 पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्या; जाणून घ्या ८ खास टीप्स
3 लस घेण्याआधी आणि नंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या
Just Now!
X