Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. खरं तर स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यातून वाढलेली स्पर्धा आणि स्वत:कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नैराश्य येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत चालली आहे. कित्येक दिवस मेहनत घेतल्यानंतरही अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यानं अनेक विद्यार्थ्यी टोकाचं पाऊल उचलत आहे. वाढलेल्या निकालामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले असले तरी प्रवेशासाठीची स्पर्धाही तीव्र झाली आहे. त्यामुळे तुम्हाला जर अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही तर खचून जाऊ नका.

ज्यावेळी तुम्हालाही कमी गुण मिळाल्यानं खचल्यासारखं वाटेल त्यावेळी या गोष्टीचा नक्की विचार करा, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील.

Maharashtra SSC 10th result 2018: अकरावीत प्रवेश घेताना इंग्रजीची भिती वाटते? तर मग या गोष्टी करा

– स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. त्यामुळे कमी गुण पडले म्हणून मनासारखं कॉलेज किंवा क्षेत्र निवडताना तुम्हाला कदाचित अडचणी येतील. पण, काही गोष्टी समजून त्याचप्रमाणे पुढचं प्लानिंग करण्याची तयारी ठेवा. कमी गुण मिळाले म्हणून रडत बसून किंवा नैराश्येत जाऊन ना गुण वाढणार ना सत्य बदलणार त्यामुळे शक्य तितक्या लवकर ‘प्लान बी’वर काम करायला सुरूवात करा.

– तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील आणि तुमचा स्वत:वर पूर्ण विश्वास असेल तर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा पर्याय तुम्ही स्वीकारू शकता.

– आताची संधी हुकली असली तरी बारावी किंवा ग्रॅज्युएशननंतर देखील अनेक करिअरचे पर्याय आपल्यासमोर असतील हे ही लक्षात असू दया आणि त्याप्रमाणे मेहनत घ्या.

– निकालातील गुणांवरच आपलं करिअर, भविष्यातील यश अवलंबून आहे हा विचार पूर्णपणे काढून टाका. असे अनेक लोक आहेत जे शालांत महाविद्यालयात अयशस्वी झाले आहेत तरीही ते जगातील यशस्वी लोकांपैकी एक आहेत. त्यामुळे खचून नक्की जाऊ नका.

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2018: कसा पहाल दहावीचा निकाल?

– सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गुणांशी इतर व्यक्तींच्या गुणांशी तुलना करू नका. दहावी हा पहिला टप्पा आहे. मेन स्ट्रीम व्यतिरिक्तही करिअरच्या अनेक नवनवीन वाटा तुमच्यासमोर आहेत त्यांचाही विचार करा कदाचित त्या वाटेवर तुम्हाला सर्वाधिक यशही मिळू शकतं.