स्वतः च्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. करोना काळात ही गोष्ट आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवली आहे. मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठ्या ताणातून जात असताना ही सेल्फ केअर नेहमीच दिलासादायक आहे. अशावेळी खास स्वतःसाठी मोकळा वेळ काढणं, ब्रेक घेणं, स्वतः आवडतील त्या गोष्टी करून पॉझिटिव्ह राहणं असं बरंच काही थोडक्यात स्वतःच स्वतःचे लाड करणं सातत्याने सुरु ठेवणं, स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी तुमच्या अत्यंत व्यस्त दिवसातला थोडा वेळ नक्कीच राखून ठेवू शकता. याच विचाराने,  WiZ च्या सहसंस्थापक मनीषा रीतेश डिंगरा यांनी काही उच्च गुणवत्तेची, परवडतील अशी पर्सनल केअर आणि हायजिन प्रोडक्ट्स आणली आहेत. दरम्यान, तुमच्या अत्यंत व्यग्र दिवसात तुम्हाला स्वतःची काळजी घेता यावी यासाठी ही ५ गोष्टींची यादी आहे. ही ५ सेल्फ केअर प्रोडक्ट्स कोणती? पाहुयात

१) घरच्या घरी स्पा

अत्यंत मोठ्या, व्यस्त आणि थकवून टाकणारा दिवस संपल्यानंतर कोमट पाण्याने केलेली आंघोळ आपल्याला निश्चितच काहीसं रिलॅक्स करू शकते. त्यातच जर तुमच्या बॉडीवॉशमध्ये नैसर्गिक घटक, सुगंधी तेलाचे अर्क आणि अप्रतिम सुगंध यासारखी वैशिष्ट्य असतील तर तुम्ही आणखी उत्तमरित्या रिलॅक्स होऊ शकता. कारण, हे तुमच्या शरीराच्या स्नायूंना रिलॅक्स करण्यासोबतच तुमचं मन शांत करण्याचंही काम करतं.

२) त्वचेची काळजी घेण्याची नियमित पद्धत : क्लीन्सर, एक्सफोलिएटर, मॉइश्चरायझर

प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपल्या चेहऱ्यावरचा मेकअप काढून चेहरा स्वच्छ धुणं हे अत्यंत आवश्यक आहे. या स्किनकेअर रुटीनची सुरुवात मेकअप रिमूव्हर वाईप्सच्या मदतीने मेपकप काढण्यापासून करा. त्यानंतर हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावर क्लिन्झर लावा. डेड स्किन आणि मळ काढून टाकण्यासाठी एक्सफोलिएट करा. या क्लिन्सिंगनंतर चांगल्या रिझल्टसाठी मॉइश्चरायझर आणि फेस सिरम नक्की लावा.

३) सैंधव मिठाच्या कोमट पाण्यात पाय ठेवा

दिवसभराच्या थकवून टाकणाऱ्या कामानंतर काही वेळासाठी कोमट पाण्यात पाय ठेवून बसल्याने तुमच्या स्नायूंचा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो. त्याचसोबत या कोमट पाण्यात जर तुम्ही सैंधव मीठ टाकलं तर तुम्हाला आणखी आराम मिळेल. प्राचीन काळापासून विविध व्याधींवर उपाय म्हणून सैंधव मिठाचा वापर होत आला आहे. यात मॅग्नेशियम सल्फेट असतं जे शरीरातून जड विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात.

४) डोळ्यांचा मसाज

आपल्यापैकी अनेकांचं बहुतांश काम कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवर होत असल्याने आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक ताण येतो. याचसोबत झोपेच्या वेळा योग्य नसल्याने डोळ्यांना सूज येणं, जळजळ होणं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येणं अशा अनेक समस्यांना आपण दररोज तोंड देत असतो. त्यामुळे डोळ्यांची सर्वाधिक काळजी घेणं महत्त्वाचं आहे. ह्यासाठी तुम्ही आय मसाजर किंवा कुलिंग आय ऑर्बिट या दोन्ही प्रोडक्ट्सचा वापर करू शकतो. यामुळे तुमच्या डोळ्यांची जळजळ थांबून तुम्हाला आराम मिळेल. सोबतच
डोळ्यांभोवतीची गडद काळी वर्तुळं देखील कमी होतील.

५) ऑरगॅनिक आणि डीटॉक्सिफाइंग चहा

ऑरगॅनिक चहामधील नैसर्गिकरित्या तणाव कमी करणारे घटक उदा.अश्वगंधा, लेमन ग्रास, कॅमोमाईल, पुदीना आणि लॅव्हेंडर आपल्या स्नायूंना त्वरित विश्रांती देतात आणि तुम्हाला शांत करतात. हे पाचक चहा नॅचरल डीटॉक्सिफायर्स आहेत. तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये दररोज याचा समावेश केल्यास तुमची पचनसंस्था आणि मज्जासंस्था अधिक शांत आणि मजबूत होऊ शकते.