‘सॅमसंग’नंतर ‘मोटोरोला’नेही फोल्डेबल फोनच्या सेगमेंटमध्ये पदार्पण केलं असून आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. यासोबतच कंपनीच्या Moto Razr या एकेकाळी लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन झालंय. Moto Razr 2019 हा स्मार्टफोन जुन्या ‘मोटो रेझर’पेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळा आहे. शानदार फोल्डेबल डिस्प्लेसह हा फोन कंपनीने लाँच केला आहे.

आतापर्यंत लाँच झालेल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोल्डेबल फोन बराच वेगळा आहे. हा फोन व्हर्टिकली (उभा) फोल्ड होतो. यापूर्वी वर्षाच्या सुरूवातीलाच मोटोरोलाचे उपाध्यक्ष(ग्लोबल प्रोडक्ट्स) डॅन कॅरी यांनी सॅमसंग किंवा Huawei या कंपन्यांची स्टाइल कॉपी न करता स्वतःच्या वेगळ्या स्टाइलमध्ये नव्या प्रकारचा फोल्डेबल फोन लाँच केला जाईल असं सांगितलं होतं. जुन्या मोटो रेझरनुसार कंपनीने या फोनचं डिझाइन ठरवलंय.

‘मोटो रेझर’ 2019 मध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात. यातील एक स्क्रीन फोनच्या आतील बाजूला आणि दुसरी स्क्रीन बाहेरच्या बाजूला आहे. अनफोल्डेड कंडिशनमध्ये आतील स्क्रीनचं आकारमान 6.2 इंच असतं. यात फ्लेक्सिबल OLED इंटर्नल डिस्प्ले, 21:9 सिनेमाव्हिजन अॅस्पेक्ट रेशोसह आहे. तर , फोन फोल्ड झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला 2.7 इंच स्क्रीन असते. हा बाहेरचा डिस्प्ले युजर्सना नोटिफिकेशन्स मिळतील. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बाहेरच्या पॅनलवरच आहे.

आणखी वाचा- Xiaomi चा बजेट स्मार्टफोन Redmi 8 साठी फ्लॅशसेल, किंमत 7,999 रुपये

फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे –
फोटॉग्राफीसाठी या फोनमध्ये दोन कॅमेरे आहे. यामध्ये नाइट व्हिजन पर्यायासह 16 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा इंटर्नल कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 9 पाय आउट-ऑफ-द-बॉक्सवर कार्यरत असेल, तसंच हा फोन ई-सिम कार्डलाही सपोर्ट करतो. हा फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेसह लाँच करण्यात आला असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट प्रोसेसर आहे. अमेरिकेत एका इव्हेंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला असून 1499 डॉलर इतकी याची अमेरिकेत किंमत ठरवण्यात आली आहे. भारतात हा फोन अद्याप लाँच करण्यात आलेला नाही, पण लवकरच हा फोन भारतातही उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती आहे.