News Flash

नवीन लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी; प्रिमिअम एसयूव्‍ही भारतामध्‍ये लाँच!

२१व्‍या शतकातील सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानासह डिझाईन केलेली अशी नवीन लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरी ही गाडी आहे.

नवीन डिस्‍कव्‍हरीची किंमत भारतामध्‍ये एक्‍स-शोरूम ८८.०६ लाख रूपयांपासून सुरू होते.

जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाने आज नवीन लँड रोव्‍हर डिस्‍कव्‍हरीच्या लाँचची घोषणा केली. या नवीन डिस्‍कव्‍हरीची किंमत भारतामध्‍ये एक्‍स-शोरूम ८८.०६ लाख रूपयांपासून सुरू होते. नवीन डिस्‍कव्‍हरीमध्‍ये अद्यावत वैशिष्ट्ये असणारे इंटीरिअर आहे. ही शक्तिशाली व कार्यक्षम सिक्‍स-सिलिंडर इंजेनिअम पेट्रोल व डिझेल इंजिन्‍सची आधुनिक जनरेशन, प्रगत पीव्‍ही प्रो इन्‍फोटेन्‍मेंट आणि उच्‍च दर्जाच्‍या आरामदायी सुविधा असलेली सात-सीटर प्रिमिअम एसयूव्‍ही आहे. जग्‍वार लँड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी सांगतात, ”नवीन डिस्‍कव्‍हरी लँड रोव्‍हरचा सर्वोत्तम क्षमतांचा वारसा कायम राखत ही गाडी लक्‍झरी व कार्यक्षमतेचा नवीन दर्जा देते. ज्‍यामुळे कुटुंबासोबत तुमचा प्रवास उत्तम आणि सुंदर होईल.”

काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये?

  • अत्‍याधुनिक डिझाइन: सुधारित एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये वैशिष्‍ट्यपूर्ण नवीन एलईडी हेडलाइट्स व टेल लाइट्ससह नवीन फ्रण्‍ट व रिअर बंपर्स
  • इंटीरिअर: सुधारित सेंट्रल कंसोलमध्‍ये प्रगत पीव्‍ही प्रो इन्‍फोटेन्‍मेंट, तर दुस-या रांगेतील नवीन सीटसह आरामदायी प्रवासाची खात्री
  • रिडिझाइन केलेली दुस-या रांगेतील सीटसला लॅटरल सपोर्ट, लांब जाड कूशन्‍स व आरामदायी सीट प्रवाशांना एैसपैस जागा व आरामदायी सुविधांची खात्री देतात.
  • जलद, स्‍मार्टर व सर्वोत्तम कनेक्‍टीव्‍हीटी: नवीन पीव्‍ही प्रो इन्‍फोटेन्‍मेंटमध्‍ये २८.९५ सेमी (११.४ इंच) एचडी टचस्क्रिन व प्रगत कनेक्‍टीव्‍हीटीसह सॉफ्टवेअर-ओव्हर-दि-एअर अपडेट्स.
  • सुधारित कार्यक्षमता: आधुनिक स्‍ट्रेट-सिक्‍स इंजेनिअम पेट्रोल व डिझेल इंजिन्‍स
  • प्रगत एअर फिल्‍ट्रेशन: नवीन केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम२.५ एअर फिल्‍ट्रेशन वाहनाच्‍या आतील हवेच्‍या दर्जावर देखरेख ठेवते आणि घातक कणांना दूर करत आरोग्‍य उत्तम राहण्‍याची खात्री देतात.

भारतातील जग्वार लँड रोव्‍हर रिटेलर नेटवर्क

जग्वार लँड रोव्‍हर वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू, भुवनेश्‍वर, चंदीगड, चेन्‍नई , कोइंम्बतूर, दिल्ली, गुरगाव, हैद्राबाद, इंदौर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई , नोएडा, पुणे, रायपूर, सुरत आणि विजयवाडा या २४ शहरांमधील २८ अधिकृत आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 4:06 pm

Web Title: new land rover discovery introduced in india ttg 97
Next Stories
1 मधुमेहाच्या रुग्णांना मदत करणारी सोप्पी योगासने!
2 जागतिक युवा कौशल्य दिन २०२१: तरुणांसाठी सरकारच्या ‘या’ आहेत कौशल्य विकास योजना!
3 मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असाल तर आहारात ‘या’ ५ गोष्टींचा करा समावेश!
Just Now!
X