15 August 2020

News Flash

पुणे-शिर्डी हेलीकॉप्टर सेवा; ५० मिनिटांमध्ये साईबाबांच्या चरणी

कार किंवा बसने पुणे ते शिर्डी या प्रवासाला ५ ते ६ तास लागतात. मात्र, हा प्रवास आता 'ब्लेड इंडिया' या कंपनीने अधिक सुखकर बनवला आहे.

पुणे : ब्लेड इंडियानं पुणे ते शिर्डी हेलीकॉप्टर सेवा सुरु केली आहे.

कार किंवा बसने पुणे ते शिर्डी या प्रवासाला ५ ते ६ तास लागतात. मात्र, हा प्रवास आता ‘ब्लेड इंडिया’ या कंपनीने अधिक सुखकर बनवला आहे. ‘ब्लेड इंडिया’ने पुणे ते शिर्डी हेलिकॉप्टर सेवा सुरु केली आहे. हा हेलिकॉप्टर प्रवास ५० मिनिटांचा आहे.

एसी हेलिकॉप्टरमध्ये बसून निसर्गाला न्याहाळत नागरिक या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. मात्र, त्यासाठी १५ हजार रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. पण जर ऑफर सुरू असताना ही सेवा नागरिकांनी घेतली तर हा प्रवास १२ हजारात करता येणं शक्य आहे.

ब्लेड इंडियाच्या ग्राहकांना व्हीव्हीआयपी कोट्यातून शिर्डीच्या साई बाबांचं दर्शन घडवण्यात येतं. या सेवेमुळं ज्यांना गाडीने पाच सहा तासांचा प्रवास झेपत नाही व थोडा आर्थिक भार उचलणं शक्य असतं अशांना फक्त ५० मिनिटांमध्ये शिर्डी गाठायची सोय झाली आहे.

सध्या पुणे-शिर्डी बरोबरच मुंबई-पुणे आणि मुंबई-शिर्डी या दोन मार्गांवरही ही सेवा पुरवण्यात येत असून मुंबईच्या मार्गावर विशेषत: व्यापारी व पर्यटक या सेवेचा लाभ घेतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 3:15 pm

Web Title: pune shirdi helicopter service within 50 minutes would be reached to sai baba temple aau 85
Next Stories
1 हिंगणघाट जळीतकांड : अशा नराधमांना २५ दिवसांत शिक्षा व्हावी, प्रणिती शिंदेंची मागणी
2 पुण्यात अभिनेत्रीला सोन्याची अंगठी चोरताना अटक
3 रंगभूमीचा इतिहास डॉ. जब्बार पटेल यांच्याशिवाय अपूर्ण!
Just Now!
X