शाओमी कंपनीने आपल्या लेटेस्ट स्मार्टफोनसाठी नवीन Redmi Note 10 सीरिज भारतात लाँच केली आहे. कंपनीने Redmi Note 10 सीरिजअंतर्गत तीन स्मार्टफोन लाँच केलेत. यात रेडमी नोट 10 (Redmi Note 10), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro) आणि रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max) हे तीन स्मार्टफोन कंपनीने आणले आहेत. या फोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, शिवाय कमी किंमतीत दमदार क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपही मिळतो.

Redmi Note 10 स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.43 इंच फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनही मिळेल.  फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 678 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 612 GPU आहे. यात 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी 48 मेगापिक्सेल सोनी IMX582 सेन्सर, दुसरा 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल, तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आणि चौथा 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS, IR, USB टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळतो. फोनमध्ये  सेल्फ क्लिनिंग स्पीकर आहे. शिवाय Redmi Note 10 मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली5000mAh ची बॅटरी मिळते. चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10 Pro  स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 Pro मध्येही अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12 चा सपोर्ट असून 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळेल. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. या फोनमध्येही क्लॉड रिअर कॅमेरा सेटअप असून मेन लेन्स 64 मेगापिक्सेल, दुसरी लेन्स 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, तिसरा लेन्स 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि चौथी लेन्स 2 मेगापिक्सल डेफ्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS, (IR), USB टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची बॅटरीही मिळेल, यातही चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10 Pro Max की स्पेसिफिकेशन्स :-

Redmi Note 10 Pro Max मध्येही अँड्रॉयड 11 वर आधारित MIUI 12 सपोर्ट असून 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर  गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 618 GPU, 8 जीबीपर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. यातही क्वॉड रिअर कॅमेरा  (108 मेगापिक्सेल सॅमसंग HM2 सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल  डेफ्थ सेन्सर) सेटअप आहे.तर, सेल्फीसाठी या फोनमध्येही 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यासोबत नाइट मोड 2.0, VLOG मोड, मॅजिक क्लोन मोड, लॉन्ग एक्स्पोजर, व्हिडिओ प्रो मोड आणि ड्युअल व्हिडिओ मोड मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/A-GPS, (IR), USB टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. या फोनमध्येही 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, यातही चार्जर फोनसोबत बॉक्समध्येच मिळेल.

Redmi Note 10, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max ची किंमत :-

Redmi Note 10 ची बेसिक किंमत 11 हजार 999 रुपये आहे. ही किंमत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची आहे, तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन अॅक्वा ग्रीन, फ्रोस्ट व्हाइट आणि शॅडो ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल. Redmi Note 10 Pro च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18 हजार 999 रुपये आहे. तर, Redmi Note 10 Pro Max च्या 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजची किंमत 18 हजार 999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 19 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max हे दोन्ही फोन डार्क नाइट, ग्लेशियर ब्लू आणि व्हिंटेज ब्राँझ अशा तीन रंगात खरेदी करता येतील. Redmi Note 10 हा फोन 16 मार्च, Redmi Note 10 Pro हा फोन 17 मार्च आणि Redmi Note 10 Pro Max हा फोन 18 मार्चपासून अॅमेझॉनच्या वेबसाइटवर आणि शाओमीच्या स्टोअर्समधून खरेदी करता येतील.