देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी सतत नवनवीन प्लॅन आणत असते. आता कंपनीने एक नवीन 444 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केलाय. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आणि जास्त डेटाचा वापर करणाऱ्यांसाठी कंपनीने हा प्लॅन आणलाय.
444 रुपयांचा प्लॅन :
या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळतो, म्हणजेच 56 दिवसांसाठी एकूण 112 जीबी डेटा वापरण्यास मिळतो. याशिवाय डेटा मर्यादा संपल्यानंतरही 64kbps इतक्या कमी स्पीडने इंटरनेटचा वापर करता येतो.
मिळेल अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग :
या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओशिवाय अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधाही मिळेल. याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.
या प्लॅन्समध्येही दररोज 2 जीबी डेटा :
444 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनशिवाय जिओच्या 598 रुपये, 2 हजार 599 रुपये, 2 हजार 399 रुपये, 599 रुपये आणि 249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्येही दररोज 2 जीबी डेटा मिळतो.