18 January 2018

News Flash

स्टॅटिन औषधे रक्ताची गुठळी रोखण्यास उपयुक्त

द लॅन्सेट हेमॅटोलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

पीटीआय, लंडन | Updated: January 26, 2017 1:15 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हृदयविकार रोखण्यासाठी वापरली जाणारी स्टॅटिन औषधे ही रक्तात गुठळी होण्याची शक्यताही २५ टक्क्यांनी कमी करतात, असा दावा वैज्ञानिकांनी केला असून त्यात एका भारतीय वंशाच्या संशोधकाचा समावेश आहे. कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या गोळ्यांमध्ये स्टॅटिनचा समावेश होतो. त्यामुळे व्हेनस थ्रॉम्बोलिझमला अटकाव होतो. त्यामुळे रुग्णालयातील मृत्यूंचे प्रमाण कमी होऊ शकते. लिसेस्टर व ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी आधीच्या ३६ संशोधनांचा परामर्श घेऊन हे निष्कर्ष काढले आहेत. या संशोधनात ३२ लाख लोकांची माहिती समाविष्ट आहे. व्हीटीईवर स्टॅटिनचा होणारा उपयोग यात लक्षात आला आहे. हृदयविकारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्टॅटिन उपचार पद्धती वापरली जाते व त्याचा फायदा व्हीटीई (व्हेनस थ्रॉम्बोलिझम) रोखण्यासाठी होऊ शकतो. सध्या हृदयरोगात मेदाम्लांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्टॅटिनचा वापर केला जातो, असे संशोधक कमलेश खुंटी व स्टेटॉर कुनुस्टॉर यांनी म्हटले आहे. व्हीटीई रोखण्यासाठी स्टॅटिनचा उपयोग जास्त प्रभावी होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.

द लॅन्सेट हेमॅटोलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मल्टीपल डिसीजच्या स्थितीतही स्टॅटिनचा चांगला उपयोग होत असल्याचे संशोधकांचे मत आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

First Published on January 26, 2017 1:15 am

Web Title: statin drugs
  1. No Comments.