26 February 2021

News Flash

आज लाँच होणार बहुप्रतिक्षित Tata Safari, किती असणार किंमत?

Tata Motors ची बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari आज अखेर भारतात लाँच होणार...

टाटा मोटर्सची (Tata Motors) बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari आज(दि.२२) अखेर भारतात लाँच होणार आहे. टाटा मोटर्सने प्रजासत्ताक दिनी(२६ जानेवारी) नवीन सफारीवरुन पडदा हटवला होता. त्यानंतर टाटा मोटर्सच्या देशातील कोणत्याही अधिकृत डिलरशीपमध्ये या एसयूव्हीसाठी ४ फेब्रुवारीपासून ३० हजार रुपयांमध्ये बूकिंगला सुरूवात झाली होती. पण अद्याप कंपनीने या गाडीच्या किंमतीबाबत घोषणा केली नव्हती. आज कंपनीकडून किंमत जाहीर केली जाणार आहे. तसेच सफारीच्या डिलिव्हरीलाही सुरूवात होईल.

स्पेसिफिकेशन्स :-
सफारी हा टाटाचा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड असून देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या एसयूव्हीला पसंती दिली आहे. टाटाची ही लोकप्रिय एसयूव्ही नव्या अवतारात पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घाण्यासाठी सज्ज झालीये. नवीन टाटा सफारी सहा विविध व्हेरिअंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. यात XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ या सहा व्हेरिअंट्सचा समावेश असेल. टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही आहे. या एसयुव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात. नवीन Tata Safari मध्ये कंपनीने “OMEGARC” (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture)प्लॅटफॉर्मचा वापर केलाय. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे. टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देत आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.

पुण्यात प्रोडक्शन :-
नवीन सफारीत नवीन एक्सटिरियर पेंट पर्याय, नवीन अलॉय व्हील्स, आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टिअरिंग व्हील्स, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंचाचा इंस्ट्रूमेंट पॅनल असेल. याशिवाय गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट आणि जेबीएल स्पीकर्सही असतील. पुण्यातील टाटाच्या प्लांटमध्ये या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरू आहे.

इंजिन :-
नवीन टाटा सफारीत 2.0 लिटर, 4-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड असतील. तसेच, तीन ESP टेरेन रिस्पॉन्स मोड- (नॉर्मल, रफ आणि वेट Normal, Tough and Wet) देखील या एसयूव्हीमध्ये आहेत.

किती असू शकते किंमत :-
भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल. 15 ते 24 लाख रुपयांदरम्यान या 7 सीटर एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची दाट शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 10:33 am

Web Title: tata safari launch in india check expected price features and other details sas 89
Next Stories
1 Jio ची जादू संपली? Airtel ने सलग पाचव्या महिन्यात केली मात
2 Nokia 3.4 : लेटेस्ट ‘बजेट’ फोनची आजपासून विक्री सुरू, किंमत 11 हजार 999 रुपये
3 Moto E7 Power : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच, किंमत १० हजारांपेक्षाही कमी
Just Now!
X