वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. याशिवाय मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात…

>

मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

>
मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

>
मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो

>
झोपण्याच्या एक तास आधी उकळेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खास करुन बद्धकोष्टावर हा उपाय करुन पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.

>
मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

>
मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.

>
डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.

>
दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.

>
मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.