जगातील आघाडीची टेक कंपनी Apple ने भारतात स्मार्ट स्पीकर HomePod लॉंच केले आहे. Amazon Echo आणि Google Home ला टक्कर देण्यासाठी कंपनीने सर्वप्रथम 2017 मध्ये हे स्मार्ट स्पीकर लाँच केले होते. पण, त्यावेळी भारतात हे स्पीकर लाँच करण्यात आले नव्हते.

फीचर्स –
अद्याप कंपनीने या डिव्हाइसबाबत माहिती दिलेली नाही, पण ‘अ‍ॅपल होमपॉड’चं पेज कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर लाइव्ह झालं आहे. अ‍ॅपलचा हा स्पीकर भारतीय बाजारात Amazon Echo ला तगडी टक्कर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर्जेदार साउंड क्वालिटीसाठी यामध्ये अ‍ॅपल-डिझाइन वूफर्ससोबत डीप बास आहे. तसेच या डिव्हाइसमध्ये सहा माइक्रोफोनचा सपोर्ट दिलाय, याद्वारे युजर्स कमांड देऊ शकतात. या होमपॉडमध्ये ए8 चिप दिली असून ‘मेश फेब्रिक डिझाइन’मधील हा स्मार्ट स्पीकर व्हाइट आणि ग्रे अशा दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल. युजर्सना या स्मार्ट स्पीकरमध्ये Siri व्हॉइस असिस्टंट फीचरचा सपोर्टही मिळेल. सिरीद्वारे होमपॉडवरुन अन्य युजरला केवळ मेसेजच नव्हे तर घरातील अन्य स्मार्ट डिव्हाइस देखील कंट्रोल करता येतील. वातावरणानुसार यातील साउंड आपोआप अ‍ॅडजस्ट होतो. यातील बिल्ट-इन ऑडिओ सिस्टिमद्वारे कॉलिंग आणि गाणी ऐकता येतील. डिव्हाइसच्या टॉपवर टच पॅनल दिलंय. या स्पीकरसोबत मल्टी रुम ऑडिओचा सपोर्ट असून याअंतर्गत वेगवेगळ्या होम पॉडना एकत्र कनेक्ट करता येतं. यामुळे युजर्सना मल्टी-रूम एक्सपीरिअन्स मिळेल. 2.5 किलो वजन असलेल्या Apple Homepod ची उंची 6.8 इंच आणि रुंदी 5.6 इंच आहे.

Apple Homepod ची किंमत –
भारतात कंपनीने या डिव्हाइसची किंमत 19,900 रुपये ठेवली आहे. याची विक्री कधीपासून सुरू होईल याबाबत माहिती कंपनीने दिलेली नाहीये, मात्र लवकरच याची विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय हा स्मार्ट स्पीकर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चीन, हाँग-काँग, जपान आणि तायवानच्या बाजारात उपलब्ध आहे. तर, दुसरीकडे कंपनीने आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठी आयओएस 13.3.1 देखील सादर केले आहे.