UPSC Recruitment 2020 : करोना विषाणूमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. देशात मंदीचे वातावारण असताना केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC) मार्फत भर्ती घेण्यात येत आहे. यूपीएससी मार्फत विविध १२१ पदासाठ भर्ती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. २४ जुलैपासून upsc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट आहे. अर्जाचे शुल्क अवघे २५ रुपये आहे. तर महिलांसाठी मोफत अर्ज करता येणार आहे.

असिस्टेंट प्रोफेसर, मेडिकल ऑफिसर, रिसर्च ऑफिसरसह अन्य पदांवर भर्ती निघाली आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी upsc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन सर्व माहिती घ्यावी. वय, शैक्षणिक पात्रता, जॉब प्रोफाइलसह इतर सर्व बाबींची माहिती घ्यावी.

शैक्षणीक पात्रता –

असिस्टेंट इंजिनिअर- या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारची मान्यताप्राप्त विद्यापीठात फजिक्स आणि केमिस्ट्री या विषयात पदवीत्तुर शिक्षण (मास्टर्स) पूर्ण असावं.

स्पेशलिस्ट ग्रेड असिस्टेंट ऑफिसर : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी अनिवार्य आहे.

कुठे किती जागा?-

मेडिकल ऑफिसर/ रिसर्च ऑफिसर- ३६ पोस्ट
असिस्टेंट इंजिनिअर- तीन पोस्ट
स्पेशलिस्ट ग्रेड ऑफिसर- ६० पोस्ट
सीनियर आर्किटेक्ट ग्रुप ए- एक पोस्ट

वयाची अट काय ? –

मेडिकल ऑफिसर- ३५ वर्ष
असिस्टेंट इंजिनियअर – ३० वर्ष
स्पेशलिस्ट ग्रेड 3 असिस्टेंट प्रोफेसर- ४० वर्ष
सीनियर साइंटिफिक ऑफिसर- ३५ वर्ष
आर्किटेक्ट – ४० वर्ष

निवड कशी होणार ? –

उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्यांना यूआर/ इडब्ल्यूएस – ५० अंक, ओबीसी- ४५ अंक, एससी/ एसटी / पीएच- ४० गुण मिळवावे लागतील. एकूण १०० गुणाची मुलाखत होईल.