17 November 2019

News Flash

पाहा: पाण्यावर चालण्याचा विक्रमी प्रयोग

चीनमधल्या शी लिलियांग या शाओलीन मोंकने (साधू) पाण्यावर चालण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे

चीनमधल्या शी लिलियांग या शाओलीन मोंकने (साधू) पाण्यावर चालण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लिलियांग हा चीनच्या क्युआंझो प्रांतात राहणारा असून त्याने पाण्यावर तब्बल १२५ मीटर इतके अंतर चालण्याची किमया साध्य करून दाखविली. यापूर्वीही पाच अयशस्वी प्रयत्नांनंतर त्याने पाण्यावर ११८ मीटरपर्यंतचे अंतर कापण्यात यश मिळवले होते. येथील स्थानिक वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, शी लिलियांग गेली १० वर्षे पाण्यावर चालण्याचा सराव करत होता. दरम्यान, पाण्यावर चालण्यासाठी लिलियांगने फ्लोटिंग बोर्डसचा आधार घेतला. मात्र, पाण्यात तरंगणाऱ्या या बोर्ड्सवर चालण्यासाठीही प्रचंड कौशल्य आणि तंत्राची गरज असते.

First Published on September 8, 2015 3:46 pm

Web Title: video shaolin monk runs on water for 125 metres breaks own record
टॅग Lifestyle