03 March 2021

News Flash

रस्त्यावरील वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यांचा अर्थ माहितीये?

जाणून घेणे महत्त्वाचे

प्रातिनिधिक छायाचित्र

आपण दररोज रस्त्यावरुन प्रवास करतो. यातही कधी महामार्गावरुनही प्रवास करतो. हा प्रवास करताना आपण आजुबाजूचे निसर्गसौंदर्य पाहतो अनेकदा दूरवर दिसणारा रस्ताही पाहतो पण याच रस्त्यावर असणाऱ्या पट्टांकडे आपले लक्ष जातेच असे नाही. तर रस्त्यांवर असणारे पांढरे आणि पिवळे पट्टे अतिशय महत्त्वाचे असतात. आपण वाहतुकीचे नियम शिकतानाही सिग्नलवर असणारे लाल, हिरवा आणि पिवळा रंग लक्षात ठेवतो. मात्र त्या पलिकडे जात रस्त्यावर असणाऱ्या पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांचे वेगळे अर्थ असतात. काय आहेत हे अर्थ जाणून घेऊया…

जाड पांढरी पट्टी

रस्त्याच्या मधोमध असणारी जाड पांढरी पट्टी म्हणजे तुम्ही लेन बदलू शकत नाही. म्हणजेच तुम्ही लेन न बदलता आहे त्याच लेनमधून जात रहावे.

तुटक पांढरी पट्टी

तुकड्या तुकड्यात असणारी पांढरी पट्टी म्हणजे आपण त्याला डिव्हायडरही म्हणतो. ही पट्टी सलग पट्टीच्या उलट अर्थ दर्शवते. तुम्ही लेन बदलू शकता असा या पट्टीचा अर्थ होतो. त्यामुळे सुरक्षित असेल तर तुम्ही लेन बदलल्यास चालते.

जाड पिवळी पट्टी

पिवळी पट्टी म्हणजे तुम्ही इतर वाहनांना ओव्हरटेक करु शकता. पण ही पिवळी पट्टी तुम्ही ओलांडू शकत नाही. आता हे नियम राज्यानुसार बदलू शकतात. उदा. तेलंगणामध्ये जाड पिवळ्या पट्टीचा अर्थ ओव्हरटेक करु नये असा होतो.

 

दोन पिवळ्या पट्ट्या

दोन पिवळ्या पट्ट्या आपण क्वचितच पाहिल्या असतील. पण शेजारी शेजारी असणाऱ्या या दोन पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ आपल्याला माहित असणे गरजेचा आहे. या दोन पिवळ्या पट्ट्या म्हणजे ओव्हरटेक करणे योग्य नाही.

तुटक पिवळी पट्टी

रस्त्यावर अशा पट्ट्या असतील तर तुम्ही ओव्हरटेक करु शकता मात्र तसे करताना तुम्ही योग्य ती काळजी घ्यायला हवी.

एक सलग आणि एक तुटक पिवळी पट्टी

या दोन पट्ट्या एकमेकांच्या बाजूला असतात. अशी पट्टी फार कमी ठिकाणी असते. पण याचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुटक पट्टी म्हणजे त्या बाजूने तुम्ही वाहनाला ओव्हरटेक करु शकता, तर सलग पिवळी पट्टी म्हणजे तुम्ही ओव्हरटेक करु शकत नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2018 5:27 pm

Web Title: what is the meaning of white and yellow lines on roads
Next Stories
1 ‘या’ आहारानं करा उन्हाळा सुसह्य
2 रक्तदाबाचे निरीक्षण करणारे अ‍ॅप विकसित
3 व्हॉटसअॅपचे व्हॉईस रेकॉर्डिंग होणारे सोपे
Just Now!
X