सध्या अनेकांच्या घरात रूम फ्रेशनरचा वापर केला जातो. घरात कोणी पाहुणे येत असतील, तर घरात छान सुगंध येण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर होतो. त्यामुळे बाजारात हल्ली अनेक प्रकारचे रूम फ्रेशनर किंवा एअर फ्रेशनर पाहायला मिळतात. त्यात तुम्ही तुमच्या आवडीचा सुगंध निवडू शकता. पण, त्यामध्ये रसायनाचा वापर जास्त प्रमाणात केला जात असल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: श्वसनासंबंधित समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी नैसर्गिक सुगंधित रूम फ्रेशनर कसे बनवायचे ते सांगणार आहोत. या रूम फ्रेशनरच्या वापराने अगदी काही मिनिटांत तुमच्या घरातील दुर्गंधी दूर होईल आणि सुगंध दरवळेल.

@kitchen_maan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून होममेड रूम फ्रेशनर कसा तयार करायचा याचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार करण्यासाठी दोन प्लास्टिकच्या लहान डब्या घ्या. त्यात एक कप रॉक सॉल्ट आणि बेकिंग सोडा घेऊन दोन्ही पदार्थ एकमेकांत व्यवस्थित मिसळा. त्यानंतर त्यात कपडे सुगंधी ठेवण्यासाठी वापरले जाणार क्लिंजर टाका. आता सगळ्यात वर कापूरच्या चार ते पाच वड्या टाकून नंतर सहा ते सात लवंगा टाका.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या प्लास्टिकच्या डब्यात हे मिश्रण टाकणार आहोत, त्याच्या झाकणाला सात ते आठ छिद्रे पाडा. अशा प्रकारे तयार होममेड रूम फ्रेशनर तुम्ही गाडीत, बाथरूम अथवा घरातील खोल्यांमध्ये ठेवू शकता. त्यामुळे घरातील दुर्गंधी कमी करण्यास मदत होईल; शिवाय तुमचे महागडे रूम फ्रेशनर खरेदी करण्यासाठी लागणारे पैसेही वाचतील.