मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असेल अशा पदार्थांचा मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात समावेश करावा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न शरीराची इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास पोट भरण्यासोबतच रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

भाजलेले चणे हिवाळ्यात साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. हरभऱ्यामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर दोन्ही आढळतात. हे दोन्ही प्रकारचे फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतात. हरभऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त २८ आहे, म्हणूनच मधुमेहाच्या रूग्णांसाठी ते निरोगी अन्नाच्या यादीत गणले जाते. एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, भाजलेले चण्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी भाजलेले चणे खाण्याचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया तज्ज्ञांकडून..

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

डायबिटीज रुग्णांनी भाजलेले चणे सालासह खावे, वजन नियंत्रणात राहील: (Chickpea Benefits For Diabetes in Marathi)

तज्ज्ञांच्या मते, भाजलेले हरभरे सालासह खाल्ले तर वजनही नियंत्रित राहते आणि शरीर निरोगी राहते. प्रथिनांनी युक्त हरभरा खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरते. स्टार्च आणि फायबरने समृद्ध, हरभरा पचन सुधारतो आणि वजन नियंत्रित करतो.

भाजलेले चणे अनिमियावर उपचार करतात: ((Chana treats anemia)

लोह, फॉलिक अॅसिड, बीटा कॅरोटीनने भरपूर असलेले चणे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करते. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते.

(हे ही वाचा: ‘या’ ४ आजारांवर औषधाप्रमाणे काम करतात पांढरे तीळ; फक्त कधी आणि कसे खावेत जाणून घ्या)

हाडे मजबूत करते ((Strengthens Bones)

कॅल्शियम आणि फॉस्फरस समृद्ध भाजलेला चणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. चण्याचे सेवन लहान मुलांपासून वृद्धांसाठी फायदेशीर आहे.

मधुमेहाच्या रुग्णांनी चणे कसे खावेत? (How to Eat Chickpea in Diabetes)

  • हरभरा भाजून त्याची पावडर बनवून तुम्ही सेवन करू शकता.
  • न्याहारीमध्ये स्प्राउट्सप्रमाणे, चणे, कांदा आणि मसाल्यांमध्ये मिसळून खाऊ शकता.
  • आमटी बनवून खाऊ शकता.
  • चणे भाजून त्याची चटणी बनवून खाऊ शकता. चणे नेहमी त्याच्या सालीसह खाण्याचा प्रयत्न करा.