How to deal with child anger issues: प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांसाठी अनेक गोष्टी करतात. त्यांना चांगले अन्न, चांगले शिक्षण मिळावे यासाठी दिवस-रात्र कष्ट घेतात. याव्यतिरिक्त त्यांचे हट्टही पुरवतात. पण कधी कधी लहान मुलांचे हे हट्ट पुरवणे पालकांसाठी खूप आव्हानात्मक असते. त्याशिवाय काही मुलं खूप रागीट, हट्टी व चिडखोर असतात. अशा मुलांच्या या स्वभावामुळे पालक सतत त्रस्त असतात. अशा मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.

पालकांनी मुलांशी संयमाने वागावे

तुमची मुलेही स्वभावाने हट्टी आणि चिडखोर झाली असतील, तर त्यांना पाहून लगेच रागवू नका. सर्वप्रथम शांत राहून त्यांच्या रागाचे कारण जाणून घ्या. मुलांना दररोज वेळ द्या; जेणेकरून मुलांना तुमच्यापासून वेगळे वाटणार नाही.

मुलांशी सकारात्मक संवाद साधा

मुलं जेव्हा हट्टी असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधायला हवा. मुलांवर ओरडण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावना काहीही असो, त्यांचा स्वीकार करा. तुम्हाला त्यांची काळजी आहे आणि तुम्ही त्यांची योग्य काळजी घेत आहात हेदेखील मुलांना जाणवून द्या.

चांगल्या वागणुकीला बक्षीस द्या

अनेक वेळा मुलं काहीतरी चांगलं करत असताना पालक त्यांचे मनोबल वाढवत नाहीत. पालकांनी आपल्या मुलांचे चांगल्या गोष्टींबाबत त्यांचे कौतुक केले पाहिजे. तुम्ही त्यांना काही बक्षिसेदेखील देऊ शकता. त्यामुळे मुलांना नेहमीच चांगले वागण्याची प्रेरणा मिळेल.

हेही वाचा: पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक

मुले चिडचिड झाल्यावर त्यांचे लक्ष विचलित करा

जर तुमच्या मुलाला कधीही राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल, तर त्याचे लक्ष एका ठिकाणाहून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा. लक्ष वळवण्याच्या या तंत्रामुळे त्याचा हट्टीपणा कमी होईल.

मुलांबरोबर फिरायल जा, खेळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही मुलांकडे फारसे लक्ष देत नाही असे जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ती चिडचिड करतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. यावेळी, तुम्ही तुमच्या मुलासोबत त्यांचा आवडता खेळ खेळा किंवा त्यांना फिरायला घेऊन जा.