What Is Nightmare Disorder: विज्ञानावर विश्वास ठेवल्यास स्वप्ने आपल्या मनाचा आरसा असतात. आपण जे काही विचार करतो ते आपल्याला स्वप्नात दिसते. तुम्हाला देखील भिती वाटते किंवा रात्री झोपेत अचानक जाग येते, किंवा खूप उशीरा पर्यंत झोप येत नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार वाईट स्वप्ने किंवा भयानक स्वप्ने पडतात तेव्हा तिला नाईटमेअर डिसऑर्डरचा त्रास होतो असे म्हटले जाते. ही स्वप्ने कधी कधी इतकी भयानक असतात की रात्री अचानक भीतीमुळे झोप उघडते. झोपेतून उठल्यानंतरही काही काळ भीतीची भावना कायम राहते.अशी स्वप्ने अनेकदा मध्यरात्री येतात. वाईट स्वप्ने पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा झोपायला त्रास होतो. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील आणि वारंवार हे होत असेल तर, डॉक्टरांना भेटायला उशीर करू नका. कारण हा एक भयानक आजार असू शकतो.

वाईट स्वप्न येण्याचे कारण

  • मूड स्विंग्स, जसे की तणाव आणि नैराश्य
  • झोप मोडणे
  • थकवा जाणवणे
  • दिवसा झोप येणे
  • कामात एकाग्रतेचा अभाव
  • नोकरी गमावणे

नाईटमेअर डिसऑर्डर लक्षणं?

  • वारंवार घाम येणे
  • श्वास घ्यायला त्रास होणे
  • राग येणे
  • टेन्शन येणे
  • नाराज वाटणे

हेही वाचा – उष्माघातापासून स्वत:ला वाचवण्यासाठी ‘या’ खास टिप्स; उन्हाळ्यात असा घ्या आहार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार अशी वाईट स्वप्न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. त्याचसोबत तुम्ही काही सोपे उपायदेखील करू शकता. रात्री झोपण्याआधी ध्यान किंवा मेडिटेशन करून झोपावे. यामुळे वाईट स्वप्न पडण्याची शक्यता कमी होते. तसेच टेन्शन घेणे कमी करावे. यासोबतच अल्कोहोलचं सेवनही कमी करावे.