केळी हे अनेकांचे आवडते फळ आहे. चवीला गोड असणाऱ्या या केळीचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. केळीमध्ये कॅल्शियम, कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीन यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे केळी खाल्ल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो. परंतु, काही वेळा केळी खाल्ल्याने मानवी शरीराचे अनेक नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या परिस्थितीत केळी खाणे टाळावे, अन्यथा तुम्हाला त्याचे अनेक नुकसान सहन करावे लागू शकते.
केळीचे फायद्यासोबत तोटेही आहेत
केळी कधी खाऊ नयेत?
केळीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. एकीकडे केळी खाल्ल्याने अनेक फायदे मिळत असले तरी ते चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते. जर तुम्हाला केळी खाण्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही काही समस्यांनी त्रस्त असाल किंवा सांगितलेल्या परिस्थितीत चुकूनही केळी खाऊ नका.
( हे ही वाचा: मधुमेह रुग्णांनी नाश्त्यात अंड्यासह ‘या’ गोष्टी खाल्ल्या पाहिजेत; Blood Sugar झपाट्याने होऊ शकते कमी)
सर्दी खोकला असल्यास केळी खाऊ नका
जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर केळी अजिबात खाऊ नये .यामुळे तुम्हाला इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेदातही अनेक ठिकाणी सर्दी खोकल्याचा त्रास असल्यास असल्यास केळी खाऊ नये असे सांगितले आहे.
रात्री केळी खाऊ नये
रात्रीच्या वेळी चुकूनही केळी खाऊ नयेत. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. रात्री केळी खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते आणि झोपेशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. केळीमध्ये भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो.
( हे ही वाचा: युरिक अॅसिडच्या रुग्णांनी चुकूनही स्नॅक्समध्ये ‘हे’ ५ पदार्थ समाविष्ट करू नका; ते शरीरात विषासारखे काम करतात)
अॅसिडिटीची समस्या असल्यास केळी खाऊ नये
जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असल्यास केळी खाऊ नका. केळीमध्ये भरपूर स्टार्च आणि फायबर असतात. त्यामुळे ते पचायला थोडा वेळ लागतो. अॅसिडिटीच्या रुग्णांनी केळी खाल्ल्यास त्यांना गॅस वाढणे, पोटात दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात.
उपाशीपोटी केळी खाऊ नका
उपाशी पोटी केळी खाल्ल्याने काही प्रकरणांमध्ये समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खराब होते. केळीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असल्यामुळे उपाशीपोटी केळी न खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र प्रत्येक व्यक्तीवर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून येऊ शकतात.
मधुमेह आणि ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तींनी केळी खाण्याआधी करा ‘हे’ काम
मधुमेह आणि ऍलर्जी इत्यादी समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी केळी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.