scorecardresearch

Bank Holidays in April 2022: महाराष्ट्रात एप्रिलमध्ये बँकांना नऊ दिवस सुट्टी; २१ दिवसच होणार व्यवहार, पाहा सुट्ट्यांची यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. यानुसार नऊ दिवस सुट्टी आहे तर २१ दिवस बँकांचे व्यवहार सुरु असणार आहेत.

Bank Holidays April 2022
एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी (प्रातिनिधिक फोटो)

बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा, कारण एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. नुकतंच आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा. करोना काळात विविध बँकांची कामं सध्या ऑनलाइन सुरू आहे. ग्राहकांनी देखील ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तरी देखील तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.

सुट्ट्यांची यादी

२ एप्रिल – बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये गुढीपाडवा, उगादी, नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगु नववर्ष, साजिबू नोंगमपांबा सण यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.

३ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

९ एप्रिल- शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

१० एप्रिल – रविवार, साप्ताहिक सुट्टी आणि राम नमवी

१४ एप्रिल – डॉ. भीमराव आंबेडकर जयंती, महावीर जयंती

१५ एप्रिल – गुड फ्रायडे

१७ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

२३ एप्रिल – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

२४ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bank holiday in april 2022 upcoming bank holiday alert detailed list of days ttg