Skin Care Tips: सुंदर दिसण्यासाठी बहुतेक लोक बरेच प्रयोग करत असतात. त्यासाठी चेहऱ्याची काळजी घेणारे आणि मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक जणी पार्लरमध्ये जाऊन सुंदर दिसण्यासाठी पैसे खर्च करतात, काही जण घरातल्या वस्तूंचा वापर करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. काही जणी महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरतात. अनेकांना आपल्या त्वचेवर प्रयोग करायची सवय असते; मात्र प्रत्येक प्रॉडक्ट आपल्या त्वचेला सूट होईल असं नसतं. असे प्रयोग कधी कधी महागात पडू शकतात. त्यामुळे त्वचेवर दुष्परिणामदेखील होऊ शकतात. त्यामुळे कोणतंही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं असतं.अनेकवेळा आपण नकळत त्वचेच्या बाबतीत चुका करतो ज्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. या चुका तुम्ही करु नका.

मेकअप करून कधीही झोपू नका –

पूर्वी स्त्रिया कधीतरीच एखाद्या सणाला वैगरे मेकअप करायच्या मात्र हल्ली महिला रोजच ऑफसमुळे मेकअप करतात. मात्र यावेळी त्वचेची काळजी घेणेही तितकचं महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑफिसमधून आल्यावर कितीही थकला असला तरी मेअकप काढल्याशिवाय झोपू नका. जास्तवेळ चेहऱ्यावर मेकअप राहिल्यास त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरळही येऊ शकतात.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

जास्त ‘स्पा’ घेऊ नका –

स्पा घेणे चांगले आहे, मात्र जास्त स्पा घेतल्याने त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. असे केल्याने त्वचेची नैसर्गिक चमक आणि लवचिकता नष्ट होते. जर तुम्हाला जास्त स्पा घेण्याची सवय असेल तर लगेच थांबवा.

पिंपल्स येणे –

पिंपल्स येणे खूप सामान्य आहे. अनेकदा मुलींना विशिष्ठ वयानंतर पिंपल्स येऊ लागतात, मात्र मुली ते पिंपल्स फोडतात, असे करणे खूप हानिकारक ठरू शकते. ज्यामुळे त्वचेवर कायमचे डाग तयार होतात.

कन्सीलर –

स्त्रिया त्वचेवरील काळे डाग लपवण्यासाठी बर्‍याचदा कन्सीलरचा वापर करतात. असे केल्याने तुमच्या चेहऱ्याला इजा होऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात आणि त्वचेचे नुकसान होऊ शकते आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू शकतात.

लिपस्टिक लावणे –

लिपस्टिक लावणे हे प्रत्येक मुलीला आवडते. पण अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी महिला स्वस्तात लिपस्टिक खरेदी करतात. लिपस्टिकची क्वालिटी तपासून घेणे गरजेचे आहे. अन्यथा ओठ काळे पडू शकतात. त्यामुळे चांगल्या ब्रँडच्या लिपस्टिकचा पर्याय निवडा.