सकाळी उठल्यावर अनेक लोकांना पोटाशी संबंधित त्रास होतो. खाण्यापिण्याच्या संबंधित कारणांमुळे गॅस, असिडीटी यांसारख्या समस्या उद्भवतात. गॅसेस जास्त प्रमाणात झाल्यास मलत्याग करण्यास अडचण येते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास हा आपल्याला आपल्या चुकीच्या खानपानामुळे होतो. बद्धकोष्ठता हा त्रास बहुतेक सर्व वयोगटातल्या लोकांना होताना दिसून येतो. आपली जीवनशैली, आहारविहार यांच्यामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. त्यापैकीच बद्धकोष्ठता हा एक सामान्य विकार आहे. त्यामुळे पोटाच्या समस्या टाळण्यासाठी योग्य आहार आणि दिनचर्या अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे.
गुपित तुमच्या स्वयंपाकघरात लपलेलं आहे
तुम्ही जर दररोज सकाळी पोट साफ न होण्याच्या त्रासाने हैराण असाल, तर ‘हे’ घरगुती उपाय तुमचं जीवन बदलू शकतात. डाएटिशियन प्राची छाब्राच्या म्हणण्यानुसार, फक्त गूळ आणि भिजवलेले किंवा भाजलेले चणे एकत्र खाल्ले, तर त्याचे शरीराला पाच जबरदस्त फायदे मिळतात. चण्यांमध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स असतंच. तसेच फॉस्फरस, प्रोटीन आणि आयर्नदेखील मुबलक प्रमाणात असतं. चणे आणि गुळामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, पण जेव्हा हे एकत्र खाण्यात येतात त्यावेळी औषधापेक्षा उत्तम काम करतात. शरीराला कोणते फायदे मिळतील पाहूयात…
१. सकाळी पोट होईल एकदम स्वच्छ

रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक चमचा गूळ आणि मूठभर चणे खा. त्यातील फायबर आणि नैसर्गिक घटक तुमच्या पचनसंस्थेला साफ करतात आणि सकाळी पोट अगदी सहज मोकळं होतं. भाजलेले चणे आणि गूळ हे या समस्यांवर गुणकारी ठरतं.

२. पचनशक्तीमध्ये जबरदस्त सुधारणा

गॅस, अपचन, पोटफुगी, बद्धकोष्ठता यांसारख्या त्रासांवर चणे आणि गूळ रामबाण उपाय ठरू शकतो.

३. शरीराला मिळते नैसर्गिक ऊर्जा

गुळातील नैसर्गिक साखर आणि चण्यातील प्रथिने, यामुळे शरीरात दिवसभर उत्साही ऊर्जा राहते. ऑफिसमधील थकवा असो किंवा विद्यार्थ्यांना एनर्जी हवी असेल, तर हा उपाय जबरदस्त आहे.

४. हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत

गूळ आणि चण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. गुळातील लोह (Iron) महिलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे. चणेही थोडं लोह देतात. दोघांचे संयुग हे शरीरातील रक्तशुद्धी आणि त्वचेच्या तेजासाठी अद्भुत ठरतात.

५. हाडं आणि सांधे राहतात मजबूत

गूळ आणि चण्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमसारखी खनिजे आढळतात. ही खनिजे हाडांसाठी खूप लाभदायी आहेत. जे हाडं बळकट करतात आणि सांधेदुखीपासून आराम देतात. विशेषतः थंडीच्या दिवसात हे रामबाण उपाय ठरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.