Benefits of Nuts: बदाम, पिस्ता आणि अक्रोडाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदाम, पिस्ता आणि काजू यांचे नियमित सेवन केल्याने अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. तुम्हाला माहित आहे का की किती प्रमाणात सुका मेव्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे? आहारतज्ञ मानसी पडेचिया यांच्या मते, प्रत्येक सुका मेव्याचे विशिष्ट प्रमाण असते त्याप्रमाणे त्यांना खाल्ले पाहिजे. यापेक्षा जास्त प्रमाणात याचे सेवन करत असाल तर याचा आरोग्यास त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया सुका मेव्याची किती प्रमाणात मात्रा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

बदाम

इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार बदामामध्ये मॅग्नेशियम आढळते. त्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सुमारे ५६ ग्रॅम सेवन केले जाऊ शकते.

( हे ही वाचा: तुम्हीही हातांची बोटे सतत मोडताय? तर या सवयीमुळे वाढू शकतो अनेक रोगांचा धोका, वेळीच जाणून घ्या)

काजू

काजूमध्ये अॅनाकार्डिक अॅसिड असते जे मानवी पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवते. यासोबतच दात किडणाऱ्या बॅक्टेरियांना मारण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये असते. तुम्ही काजूचे ११ तुकड्यांचे सेवन करू शकता.

पिस्ता

पिस्ता हे अमिनो ऍसिड एल-आर्जिनिनचे एक उत्तम स्त्रोत आहे, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. पिस्ता व्हिटॅमिन बी ६, फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर विविध पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. वजन कमी करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात देखील हे खूप उपयुक्त आहे. डायटीशियन मानसी यांनी सांगितले की, हे आतडे आणि डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. याचे २१ तुकडे तुम्ही खाऊ शकता.

( हे ही वाचा: मीठ खाल्ल्याने युरिक ऍसिड वाढू शकते का? आयुर्वेद तज्ज्ञाकडून जाणून घ्या काय आहे सत्य)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्रोड

अक्रोडमध्ये ६५% चरबी आणि १५% प्रथिने असतात. हे अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्यात फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. याच्या सेवनाने हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. याचे चार तुकडे सेवन केले जाऊ शकते.