scorecardresearch

भारती सिंहने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं? फॅन्सना सांगितले ‘हे’ ४ सिक्रेट फंडे

Bharti Singh Weight Loss Diet: दुर्दैव असे की, भारतीला ही विनोदाच्या बाबत बहुतांश वेळा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. या टोमण्यांचा पंच लाईन्सचा…

Bharti Singh Extreme Weight Loss Transformation Lost 15 Kgs Shares Diet Plan And Secrets To Loose Fats Fast
भारती सिंगने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Bharti Singh Weight Loss Transformation: गेल्या काही वर्षांमध्ये, भारती सिंग हे घराघरात पोहोचलेले नाव बनले आहे. पुरुषांची मक्तेदारी मानल्या जाणाऱ्या कॉमेडी विश्वात भारती आज भारदस्त व्यक्तिमत्व ठरलं आहे. दुर्दैव असे की, भारतीला ही विनोदाच्या बाबत बहुतांश वेळा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. या टोमण्यांचा पंच लाईन्सचा भारतीच्या खेळकर स्वभावावर कधी परिणाम झाला नाही पण काही महिन्यांपूर्वी तिला आपल्या वजनामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. डायबिटीजने ग्रस्त झाल्यावर भारतीने अखेरीस आपल्या शरीरात बदल करण्याचा निर्धार पक्का केला आणि मग सुरु झाली तिची वजन कमी करण्याची मोहिम.

भारतीने आतपर्यंत तब्बल १५ किलो वजन कमी केले आहे. एका मुलाखतीत भारतीने आपल्या जेवणावरील प्रेमावर भाष्य केले तसेच खाण्याची आवड असतानाही डाएटचे पालन कसे केले हे सिक्रेट फंडेही तिने सांगितले आहेत. तिच्या रुटीनच्या मदतीने कदाचित आपणही आपल्या वजन कमी करण्याच्या मोहिमेत काही प्रमाणात यश मिळवू शकता. हे फंडे काय होते व भारतीने १५ किलो वजन कसे कमी केले पाहुयात…

1) इंटरमिटंट फास्टिंग: डाएट प्लॅन्समध्ये सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. भारतीने सुद्धा या प्रकारेच १५ किलो वजन कमी केले आहे. तिने संध्याकाळी ७ नंतर जेवण बंद केले व डिनर नंतर तिचे पुढचे जेवण थेट दुसऱ्या दिवशी दुपारीच व्हायचे.

2)जेवण स्किप करू नका: जरी भारतीने आहाराचे काटेकोर वेळापत्रक पाळले असले तरी, तिने कोणतेही जेवण वगळले नाही, तिने नेहमी ठरलेल्या वेळात आहार घेतल्याचे भारती सांगते.

3) पोर्शन कंट्रोल: यापूर्वी अनेकांनी वजन कमी करताना हा फंडा पाळला आहे. अगदी आलिया भट्ट पासून ते भूमी पेडणेकर पर्यंत अनेक सेलिब्रिटी या पद्धतीला आपल्या फिटनेसचे श्रेय देतात. भारतीने सुद्धा तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान एक गोष्ट निश्चित केली ती म्हणजे अन्नाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे. तिने जे आवडते ते खाल्ले पण जास्त खाणे टाळले.

हे ही वाचा<< पुणेकर बरोबर बोलले होते! दुपारी वामकुक्षी घेण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क; झोपण्याची योग्य पद्धत व वेळ जाणून घ्या

4)जेवणाची वेळ: भारती सांगते, अनेकदा शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रक आणि जीवनशैलीमध्ये अडकलेली असताना, डाएट पाळणे कठीण व्हायचे पण तुम्ही वेळेचे जितके पालन कराल तितका डाएटचा प्रभाव अधिक दिसू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, तुम्ही तुमच्या शरीरानुसार डाएटचे प्लॅन निवडण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ला घेऊ शकता)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 17:10 IST

संबंधित बातम्या