‘बुलेट’ची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी ‘रॉयल एनफील्ड’ने भारतातील आपल्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक Classic 350 बुलेट ही BS6 इंजिनसह लाँच केली आहे. बीएस6 मानकांसह लाँच झालेली ही रॉयल एनफील्डची पहिलीच मोटरसायकल असून 31 मार्चपर्यंत अन्य बाइक्सही बीएस6 मानकांसह सादर केल्या जातील अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.

रॉयल एनफील्डने बीएस6 क्लासिक 350 मध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युअल इंजेक्शन सिस्टिम दिली आहे. अपडेटेड क्लासिक 350 स्टील्थ ब्लॅक आणि क्रोम ब्लॅक अशा दोन नव्या रंगांमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय सिग्नल्स एअरबॉर्न ब्लू, सिग्नल्स स्टॉर्मरायडर सँड, गनमेटल ग्रे आणि क्लासिक ब्लॅक कलरमध्येही उपलब्ध असेल. स्टील्थ ब्लॅक आणि गनमेटल ग्रे कलरमधील रॉयल एनफील्ड क्लासिक 350 मध्ये अॅलॉय व्हिल्स आणि ट्युबलेस टायर स्टँडर्ड दिले आहेत. रॉयल एनफील्डने बीएस6 मॉडेल इंजिनच्या आउटपुटबाबत माहिती अद्याप दिलेली नाही. पण, इलेक्ट्रॉनिक फ्युअल इंजेक्शन सिस्टिममुळे इंजिनच्या रिफाइन्मेंट, ड्राइवेबिलिटी आणि थंडीमध्ये स्टार्ट करण्याच्या क्षमता सुधारण्यास मदत होईल असे कंपनीने म्हटले. उत्तम परफॉर्मंससाठी पावर आणि टॉर्क डिलिव्हरीला ट्यून आणि ऑप्टिमाइज करण्यात आलं आहे.

वॉरंटी, बुकिंग आणि किंमत : 
कंपनीच्या सर्व बीएस-6 बाइक्सवर तीन वर्ष रोडसाइड असिस्टंस आणि तीन वर्षांची वॉरंटी मिळेल. नव्या बुलेटच्या बुकिंगलाही सुरूवात झाली असून कंपनीच्या डिलरशिपमधून 10 हजार रुपयांमध्ये बुक करता येईल. 1.65 लाख रुपये इतकी नव्या बुलेटची एक्स-शोरुम किंमत आहे. ड्युअल चॅनल एबीएससह लाँच केलेल्या BS6 Royal Enfield Classic 350 ची किंमत आधीच्या बीएस4 मॉडेलपेक्षा जवळपास 11 हजार रुपयांनी अधिक आहे.