How to Reduce BP Naturally: भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमुळे तुमच्या जेवणाची चव तर वाढतेच; पण त्यासोबतच तुमच्या आरोग्याला फायदे मिळतात. मसाल्यांमधील अनेक घटक तुमच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा एक छोटासा, पण सुगंधी मसाला जो केवळ चव नाही, तर रक्तदाब नियंत्रित करण्याचं ताकदवान नैसर्गिक औषध ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? होय! हे खरं आहे. एका संशोधनात हे स्पष्ट झालंय की, हा मसाला सिस्टोलिक आणि डायस्टोलिक बीपी अशा दोन्ही घटकांवर परिणाम करतो. दररोज तीन ग्रॅम या पदार्थाचे सेवन केल्यास १२ आठवड्यांत रक्तदाब सामान्य झाला, असं क्लिनिकल स्टडीत आढळून आलंय.
उच्च रक्तदाबानं त्रस्त आहात? औषधं घेऊनही फरक पडत नाही? मग ही बातमी तुमचं आयुष्य बदलू शकते. स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा एक छोटासा, गोडसर सुगंध असलेला मसाला… जो केवळ स्वाद वाढवत नाही, तर रक्तदाबावर नैसर्गिकरीत्या जबरदस्त परिणाम करतो. शोधकर्त्यांनाही विश्वास बसला नाही, जेव्हा एका अभ्यासात या मसाल्यानं १२ आठवड्यांत रक्तदाब सामान्य केला. ‘ही’ छोटीशी गोष्ट तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी ठरू शकते आयुष्यभराचं वरदान!
फक्त एवढंच नाही, तर हा मसाला शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतो, रक्तप्रवाह सुरळीत करतो, सूज कमी करतो आणि हृदयावरचा दाब कमी करतो. त्याशिवाय या मसाल्याचा मूत्रवर्धक गुणधर्म म्हणजे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकले जाते आणि त्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होतो. विशेष म्हणजे या उपायाने कोणताही साइड इफेक्ट होत नाही. या मसाल्याचा उपयोग पचनशक्ती राखण्यासाठी, तसेच अस्वस्थता, मळमळ व उलट्या यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो.
कसा वापर कराल?
- रोज अर्धा ते एक चमचा ताजी बारीक केलेली पावडर घ्या.
- चहा, दूध, स्मूदी, दही किंवा ओट्समध्ये सहज वापर करता येतो.
- जेवणानंतर दोन-तीन दाणे चघळा – नैसर्गिक माऊथ फ्रेशनरही!
शेवटी हा मसाला केवळ तुमच्या चवीलाच नाही, तर हृदयालाही तारतो. हजारो वर्षांपासून आयुर्वेदात याचा वापर होतोय आणि आता आधुनिक विज्ञानही याची ताकद मान्य करतंय.
पण हा चमत्कारी मसाला नेमका कोणता?
तो म्हणजे छोटी वेलची! होय, आपल्या घरात असणारी ही सुवासिक वेलची फक्त स्वादापुरती मर्यादित नाही, तर रक्तदाबाच्या नियंत्रणासाठीही तो एक प्राचीन व परिणामकारक असा देशी उपाय आहे. सामान्यतः आपण त्या वेलचीचा मिठाई, चहा, पुलाव यामध्ये वापर करतो. तिचा सुगंध सगळ्यांनाच भुरळ घालतो. ताज्या वेलचीचे सेवन केल्यामुळे तुमच्या तोंडामधील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते. वेलचीमधील गुणधर्म तुमच्या हिरड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. वेलची खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय वाढते आणि तुमचे वजन कमी होण्यास आणि ते नियंत्रित राहण्यास मदत होते. वेलचीमधील जीवाणूंमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. पण, तुम्हाला माहितीय का, हीच छोटी वेलची रक्तदाब नियंत्रणात आणण्याचं एक प्रभावी आणि नैसर्गिक औषध ठरू शकतं.