चाणक्य हे इतिहासातील एका महान विद्वानांपैकी एक होते. नंद घराण्याला सत्तेपासून दूर सारत चंद्रगुप्त मौर्यासारख्या सामान्य मुलाला चाणक्य यांच्या धोरणांमुळे सिंहासनावर बसता आलं. चाणक्य यांना अर्थशास्त्र आणि जीवनातील धोरणांसाठी ओळखलं जातं. त्यांनी दिलेले उपदेश आजही लागू होतात. त्यांनी सांगितलेल्या धोरणांचा अवलंब केल्यास आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात.

इंद्रियांवर नियंत्रण ठेवा: चाणक्य नीतिनुसार व्यक्तीने नेहमी आपल्या इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवावे. स्थळ, वेळ आणि क्षमता लक्षात घेऊन आपले ध्येय पूर्ण केले पाहिजे. यामुळे तुमचे काम नीट तर होईलच, पण तुम्ही नियमित आणि संयमी व्हाल.

कमी बोला, जास्त ऐका: चाणक्य यांच्या मते, श्रीमंत व्यक्तीचे अनेक मित्र असतात. कारण फक्त श्रीमंत व्यक्तीच जास्त ज्ञानी मानली जाते. चाणक्य यांच्या मते श्रवणाने धर्माचे ज्ञान मिळते, अशी त्यांची धारणा होती. द्वेष जवळ येत नाही, आणि श्रवणाने ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच तुम्ही बोलण्यापेक्षा जास्त ऐकले पाहिजे.

मेहनत घ्या: कोंबड्यांकडून अनेक गोष्टी शिकता येतात. उदाहरणार्थ, एखाद्याने नेहमी वेळेवर उठले पाहिजे. याशिवाय तुम्ही निर्भय असले पाहिजे. चाणक्य यांनी सांगितले आहे की, माणसाने मेहनत करून पैसे कमावले पाहीजेत. नातेवाईकांमध्ये मालमत्तेची योग्य वाटणी करावी. गैरमार्गाने आलेला पैसा टिकत नाही.

Astrology 2022: १४१ दिवस वक्री अवस्थेत असणार कर्मदेवता शनिदेव; चार राशींच्या अडचणीत होणार वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वत:ची कामं स्वत: करा: आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वत:ची कामं स्वत: केली पाहीजेत. आपली कामं नेमाने केली पाहीजेत. तसेच काम केल्यानंतर समाधानी राहावे. कपटी माणसाचा मित्र होण्यापेक्षा मित्रच नसावा. लालची व्यक्तीला एखादं गिफ्ट देऊन संतुष्ट करा. मुर्ख व्यक्तीला आदर देऊन संतुष्ट करा. तर विद्वान व्यक्तीला सत्य सांगितल्याने समाधानी होतो.