Methi water benefits: आजारांवर उपचार करण्यासाठी घरगुती उपचार अत्यंत प्रभावी आहेत. शतकानुशतके लोक नैसर्गिक आणि घरगुती उपचारांनी अनेक जुनाट व गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करीत आहेत. योग्य आणि नियमित वापराने, हे उपाय शरीराला आतून मजबूत करतात आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय हळूहळू आरोग्य सुधारतात. अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचा वापर केला गेला आहे. स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला असलेले मेथीचे दाणे केवळ अन्नाची चव वाढवतातच असे नाही, तर अनेक आजारांवर उपचार करण्यासदेखील मदत करतात.
लोक अनेकदा सकाळी रिकाम्या पोटी डिटॉक्स ड्रिंक म्हणून मेथीच्या दाण्यांचे पाणी सेवन केले जाते. सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या बियांचे एक ग्लासभर पाणी पिणे क्षुल्लक वाटेल; परंतु हा जुना उपाय शरीराला आतून मजबूत करतो. हेल्थलाइनच्या मते, मेथीच्या बियांचे पाणी प्ययाल्याने पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित होते आणि शरीर डिटॉक्सिफाय होते. या सोनेरी रंग ल्यालेल्या मेथीच्या लहानखुऱ्या बियांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स व पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराचे कार्य आणि त्वचेची चमक हळूहळू सुधारते. मेथीच्या दाण्यांचे पाणी १५ दिवस सेवन केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
हे पाणी दररोज प्यायल्याने रक्तातील साखर आपोआप सामान्य होते. मेथीच्या बियांमध्ये असलेले विरघळणारे फायबर गॅलेक्टोमनन साखरेचे शोषण कमी करते. मेथीच्या बियांचे १५ दिवस नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेतील चढ-उतार नियंत्रित होण्यास मदत होते. इन्सुलिन प्रतिरोधनाची सुरुवातीची लक्षणे असलेल्यांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. असंख्य अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, हे मेथीचे दाणे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे शरीर साखरयुक्त चरबी म्हणून साठवण्याऐवजी ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास अधिक चांगल्या रीतीने प्रोत्साहन देते.
सौम्य, पण प्रभावी चयापचय वाढवते
मेथीचे पाणी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीरातील चयापचय प्रक्रिया हळूवारपणे सक्रिय करते. त्यात असलेले नैसर्गिक संयुगे पाचन एंझाइम्सना उत्तेजित करतात आणि चरबीचे विघटन सुधारतात. लोकांना अनेकदा असे आढळून येते की, ते सेवन केल्याने त्यांना हलके वाटण्यास मदत होते आणि पोटफुगी कमी होते. NIH मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, मेथीचे पाणी चयापचय स्थिर करण्यास मदत करते, शरीराचे ऊर्जा संतुलन राखते.
पोट आणि पचनसंस्था स्वच्छ व हलकी होते
मेथी नैसर्गिक स्वच्छता करणारे म्हणून काम करते. त्यातील फायबर आतड्यांमधील घाण आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीच्या बियांचे पाणी प्यायल्याने गॅस, छातीत जळजळ व आम्लता कमी होते. फक्त दोन आठवड्यांत पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके वाटते. ज्यांना वारंवार अपचनाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हा एक अतिशय फायदेशीर उपाय आहे.
त्वचेला नैसर्गिक चमक आणते
मेथीच्या पाण्यातील डिटॉक्सिफायिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांचा त्वचेवरही परिणाम होतो. शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त तेल बाहेर पडताच, मुरमे व पुरळ कमी होऊ लागतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशी दुरुस्त करतात आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करतात. दोन आठवडे हे पाणी प्यायल्याने चेहरा स्वच्छ, ताजा व नैसर्गिकरीत्या चमकणारा दिसेल.
हार्मोनल बॅलन्स सुधारतो
मेथीच्या बियांमध्ये अशी संयुगे असतात, जी इस्ट्रोजेन हार्मोनची नक्कल करतात. हे विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल चढ-उतार नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे. हे मूड स्थिर करण्यास मदत करते, सूज व पोटफुगी कमी करते आणि मासिक पाळीदरम्यान अस्वस्थता कमी करते. हा औषधांवजी पर्याय नाही; परंतु शरीर संतुलित करण्यासाठी आणि मानसिक व शारीरिक विश्रांती प्रदान करण्यासाठी एक नैसर्गिक आधार म्हणून काम करते.
शरीर हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहते
भिजवलेल्या मेथीच्या बियांमध्ये म्युसिलेज फायबर हा जेलसारखा पदार्थ आहे, जो शरीरात ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने शरीर खोलवर हायड्रेट राहते. त्यामुळे थकवा आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करतो. त्याची सौम्य व मातीची चव सकाळची शांत आणि संतुलित सुरुवात प्रदान करते. या बियांमुळे शरीर आतून ताजेतवाने आणि ऊर्जावान होते.
मेथीचे पाणी कसे बनवायचे आणि प्यावे?
रात्रभर एक चमचा मेथीचे दाणे एका ग्लासभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी बिया गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी ते प्या. हवे असल्यास तुम्ही ते पाणी कोमट करून पिऊ शकता किंवा भिजवलेल्या बिया चावून खाऊ शकता, ज्यामुळे फायबरचे फायदे दुप्पट होतात. हे १५ दिवस सतत प्या. जर तुम्हाला काही अस्वस्थता वाटत असेल, तर काही दिवस ब्रेक घ्या.