Diwali Padwa 2025 Wishes Messages SMS Quotes: दिवाळी म्हटलं की, मनात सगळ्यात आधी येतात ते चमचमणारे दिवे, रंगीबेरंगी रांगोळ्या, गोड-तिखट फराळाचा सुवास आणि नात्यांमधील उबदारपणा. संपूर्ण वातावरणच आनंदानं उजळून निघालेलं असतं. आणि या दिवाळीचा सगळ्यात मोहक दिवस म्हणजेच दिवाळी पाडवा, ज्याला बलिप्रतिपदा, असंही म्हणतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा होणारा हा सण, प्रेम, नातं व समृद्धीचं प्रतीक मानला जातो. पाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात, नव्या उमेदीनं आणि नव्या आशेनं जीवनाकडे पाहण्याचा क्षण. म्हणूनच हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त मानला गेला आहे.
या दिवशी व्यापारी वर्ग नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करताना चोपडीपूजन वा वहीपूजन करतो, कारण- लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद हाच त्यांच्या यशाचा पाया मानला जातो. तर, गृहिणी या दिवशी आपल्या पतीला ओवाळून त्यांचं आयुष्य सुखी आणि समृद्ध होवो, अशी मंगल कामना करतात. काही ठिकाणी पती पत्नीला सुंदर भेट देऊन या प्रेमबंधनाचं नातं अधिक घट्ट करतात.
दिवाळी पाडवा हा फक्त सण नाही, तर नात्यांचा उत्सव आहे. या दिवशी रुसवे-फुगवे विसरून घराघरात पुन्हा जिव्हाळा, प्रेम व आनंदाचं वातावरण निर्माण होतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. अंधारावर प्रकाशाचा, कटुतेवर प्रेमाचा आणि दु:खावर आनंदाचा विजय दाखवणारा हा दिवस दिव्यांचा, प्रेमाचा आणि नव्या सुरुवातीचा सण आहे. या खास दिवशी तुमच्या मित्र-परिवाराला WhatsApp Status, SMS, Quotes आणि HD Greetings द्वारे हटके शुभेच्छा द्या आणि या पवित्र सणाची आनंदमयी लाट सर्वत्र पसरवा!
दिवाळी पाडव्याला आपल्या प्रियजनांसाठी खास मराठी मेसेजेस आणि स्टेटस कलेक्शन!
आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा,
दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

नवा सुगंध – नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

अशाप्रकारे तुम्ही दिवाळी पाडव्याला प्रियजनांना खास मराठीतून मेसेज, स्टेटस आणि शुभेच्छा संदेश पाठवून तुमचं नातं आणखी गोड करु शकता.