केसांमुळे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य आणखी खुलते. आपण आकर्षक दिसाव असं प्रत्येकालाच वाटत असते, त्यामुळे काही जण केसांची विशेष काळजी घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स वापरले जातात. पण केसांना पोषक तत्व मिळावीत यासाठी केसांना तेल लावणे देखील तितकेच महत्वाचे असते. रोज नियमितपणे केसांना तेल लावले की केस घनदाट आणि काळे राहतात असा सल्ला तुम्ही जेष्ठ मंडळींकडून नक्की ऐकला असेल. पण काही जणांना तेलाचा चिकटपणा आवडत नाही त्यामुळे ते रोज तेल लावणे टाळतात.

रोज केसांना तेल लावणे, केसांची योग्यरित्या काळजी घेणे यासाठी सहसा वेळ मिळत नाही. यासाठी बऱ्याच वेळा आठवड्यातून एकाच दिवशी डोक्याला तेल लावले जाते. असे केल्यानंतर काही स्त्रिया दुसऱ्या दिवशी केस धुतात म्हणजे रात्रभर हे तेल डोक्यावर तसेच असते. पण असे केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. यामागचे कारण जाणून घ्या.

Skin Care Tips : टॅनिंगमुळे चेहरा निस्तेज झालाय? तर ‘हे’ घरगुती उपाय वापरुन पाहाच

केसांना रात्रभर तेल लावून ठेऊ नये?

  • तेल केसांना मॉइश्चराइज करण्याचे काम करते. जेव्हा आपण केसांना तेल लावतो तेव्हा जास्तीत जास्त ३० मिनिटांमध्येच केस मॉइश्चराईज होतात. त्यामुळे केस धुण्याच्या काही वेळ आधी तुम्ही तेल लावू शकता. रात्रभर तेल तसेच ठेवण्याची गरज नाही.
  • ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ केसांना तेल लावून ठेवले तर केसात असलेला डेंड्रफ चिकट होऊ शकतो.
  • जास्त वेळ केसाला तेल लावून ठेवले तर केसात हवेतील धूळ जमा होते.
  • सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रात्रभर केसांना तेल लावून ठेवल्याने केसांना जास्त पोषक तत्व मिळतात असे नाही. आयुर्वेदात सुद्धा केस धुण्याच्या थोडा वेळ आधी केसांना तेल लावावे असा सल्ला देण्यात आला आहे.

Hair Care Tips : शॅम्पू लावल्यानंतर तुमचे केस आणखीनच गळतात का? ‘या’ टिप्समुळे होईल फायदा

केसांसाठी कोणते तेल आहे उत्तम?

जाहिरातीमध्ये दिसणारे महागड्या ब्रँडचे तेल आकर्षक असते. पण फक्त त्यातूनच केसांना पोषक तत्व मिळतात असे नाही. तुम्ही नारळ, आवळा, मोहरी यांसारख्या पदार्थांचे तेल केसांसाठी वापरू शकता. असे नैसर्गिक तेल वापरल्यामुळे तुमचे केस काळे, लांब आणि घनदाट राहण्यास नक्कीच मदत मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरता तज्ञांचा सल्ला घ्या.)